श्रीरामपूर दिपक कदम श्रीरामपूर शहरात त्र्यंबकेश्वरहून निघालेल्या श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे चैतन्याने भक्तिमय वातावरणात अभूतपुर्व अशा उत्साहात स्वागत करण्यात आले.
छाया सुनिल पांढरे
दत्तनगरपासून ते थेट बेलापूर रस्त्याच्या वेशीपर्यंत संगमनेरोड,मेनरोड, बेलापूररोड ठिकठिकाणी वारकऱ्यांना पाण्याचे पाऊच,बिस्किट पुडे, खिचडी, गुडीशेव, फरसाण आदींचे पाकीटं देण्यात येत होते. तृतीयपंथी यांनी देखील भाविक भक्तांना लाडू प्रसादाचे वाटप केले.
शहरात दोन ठिकाणी लहान मुलांना विठ्ठल-रूख्मिणीची वेशभुषा परिधान करून स्वागतासाठी उभे करण्यात आलेले होते. संपूर्ण दिंडीच्या मार्गावर ठिकठिकाणी डिजेवर पांडुरंगाचे गाणे लावलेले होते. त्यामुळे अख्या शहरात आज विठ्ठल नामाचा गजर सकाळपासून ऐकायला मिळत होता. त्यामुळे शहरातील वातावरण भक्तीमय अनुभवायला मिळाले.
तृतीयपंथीयांकडून भाविकांना लाडू प्रसादाचे वाटप
-श्रीरामपूर शहरामधील वारकऱ्यांना प्रसाद लाडू वाटून आनंद व्यक्त करताना तृतीयपंथीय यांचे गुरु पिंकी शेख व त्यांचे सर्व सहकारी
