श्रीरामपूरचे मा.आ.भानुदास मुरकुटेंचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत मुंबईत प्रवेश

Cityline Media
0
माजी आमदार मुरकुटेंच्या पक्षप्रवेशामुळे श्रीरामपुरातील गणिते बिघडणार

मुंबई दिपक कदम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल शनिवारी श्रीरामपूर येथील माजी आमदार भानुदास मुरकुटे,निरज मुरकुटे,गणेश छल्लारे, प्रवीण फरगडे, संजय छल्लारे, सिद्धांत छल्लारे, लक्ष्मण कुमावत,भगवान उपाध्ये, शेखर दुब्बैया, तेजस बोरावके, रोहित नाईक, संजय साळवे, संजय परदेशी,महेंद्र टाटिया यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत मुंबई येथे जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी शिवसेनेचे राज्य सचिव राम रेपाळे,सचिव संजय मोरे, प्रवक्ते राहुल लोंढे, मा आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पक्षप्रवेशामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक बळावणार आहे त्यामुळे श्रीरामपूर अनेक गणिते बिघडणार असल्याचे यावेळी बोलण्यात येत आहे.हा पक्ष प्रवेश विकासाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे असे देखील सांगण्यात आले आहे.

ग्रामीण व शहरी भागातील अनेक माजी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच, व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्याचा या सोहळ्यात लक्षणीय सहभाग होता.त्यामुळे येत्या काळात स्थानिक राजकारणात मोठे बदल घडण्याची चिन्हे आहेत. याप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. मुख्यमंत्री असताना राज्यातील सर्वसामान्यांसाठी अनेक लोककल्याणकारी योजना
आम्ही आणल्या.सध्या महायुतीची दुसरे पर्व सुरू आहे. देवेंद्र फडणवीस आणि माझ्या नेतृत्वाखाली सरकारने महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेताना 'सर्वसामान्य माणूस' केंद्रस्थानी ठेवला आहे. महाराष्ट्राची प्रगती, 
औद्योगिक वाढ आणि सामाजिक समरसता हेच आमचे ध्येय

-सर्वसामान्यांसाठी प्रगती आणि समृद्धीचे सरकार

एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करतो,हे मुख्यमंत्री असताना मागील अडीच वर्षांत महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आणि अनुभवले. महायुतीच्या नेतृत्वाखाली सरकार हे स्थगिती नव्हे, तर प्रगती व समृद्धीचे सरकार असल्याचा पुनरुच्चार ना. शिंदे यांनी केला आहे.

मुरकुटे यांच्या प्रवेशाने. या सोहळ्यात विशेष लक्ष वेधून घेतले ते निरज मुरकुटे यांनी माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे नातू निरज यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतल्यानंतर थेट शिवसेनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. याबद्दल शिंदे म्हणाले, "समाजहितासाठी उच्चशिक्षित पिढीने राजकारणात सक्रीय भाग घेणे ही काळाची गरज आहे. निरज मुरकुटे यांच्यासारखे तरुण हे पक्षाला बळकटी देणारे आहे."असेही नामदार शिंदे म्हणाले.

याच कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेचे युवा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या अलीकडील परदेश दौऱ्याचा विशेष उल्लेख केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.

श्रीकांत यांनी चार देशांच्या दौऱ्यात ऑपरेशन सिंदूर' संदर्भात भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली आणि पाकिस्तानचा खरा चेहरा उघड केला. त्या चारही देशांनी भारताला पाठिंबा देत पाकिस्तानला विरोध दर्शवला, असे त्यांनी स्पष्ट केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!