नाशिक दिनकर गायकवाड वीस टन २१० किलो वजनाचे व ८ लाख ८२ हजार रुपये किमतीचे भंगाराचे साहित्य इच्छितस्थळी पोहोचविण्यासाठी गेलेल्या ट्रकबालकाने या भंगार मालाचा अपहार केल्याच्या संशयातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की फिर्यादी इक्बाल अहमद खान (रा. डॉ. हेडगेवारनगर, त्रिमूर्ती चौक, सिडको) हे भंगार मालाचे व्यापारी असून, त्यांचे एए ट्रेडर्स नावाचे अंबड लिंक रोड येथे आझादनगरमध्ये भंगार मालाचे दुकान आहे. या दुकानात जमा झालेले स्क्रॅप भंगार माल अंबड लिंक रोड येथे रऊफ सर्वेम मर्चट यांच्याकडे पाठवायचा होता.त्यासाठी फिर्यादीच्या ओळखीचा आयशरचालक आसिफ युसूफ पठाण (रा. सुंदरनगर, बंदनझिरा, ता. जि. जालना) हा त्यांच्या दुकानावर आला.
फिर्यादी यांनी दुकानातील भंगार माल अंबड लिंक रोडला रऊफ स्क्रैप मर्चेंट याच्याकडे घेऊन जायचा असल्याचे सांगितले. हा माल मी सोडून देतो, असे सांगून आरोपी पठाण याने एमएच ०९ सीए १०१३ या क्रमांकाची आयशर गाडी घेऊन तो दुकानावर आला. त्यानंतर फिर्यादी खान यांच्या दुकानातील कामगारांनी या आयशर वाहनामध्ये एकूण ८ लाख ८२ हजार ३६५ रुपये किमतीचा २० टन २१० किलो वजनाचा भंगार माल भाला, हा माल घेऊन आरोपी चालक पठाण हा ट्रक दुकानाबाहेर घेऊन गेला.
काही वेळाने फिर्यादी खान यांनी त्याला फोन केला असता गाठीच्या पाट्याचे काम बालू असल्यामुळे माझी गाडी गॅरेजवर लावली आहे. गाडीचे काम पूर्ण होताच भंगार माल सांगितलेल्या ठिकाणी पोहोचवून देतो, असे सांगितले. गेल्या पाच वर्षांपासून हा ट्रम्पालक फिर्यादीच्या दुकानातून माल घेऊन जात असल्यामुळे फिर्यादीने फारसा विचार केला नाही; मात्र ट्रकचालकाने गाडीमध्ये सोड केलेला भंगार माल संबंधित ठिकाणी पोहोचविला नाही.
त्यानंतर फिर्यादीने पुन्हा त्याच्याशी फोनवर संपर्क साधला; मात्र गाडीचे काम चालू असल्याचे त्याने सांगितले त्यानंतर मात्र फिर्यादी यांना संशय आला. त्यांनी चालकाशी वारंवार संपर्क साधला; मात्र तो सविस्तर माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ करीत असल्यामुळे फिर्यादी खान यांनी जालना येथे चालकाच्या घरी जाऊन त्याचे वडील युसूफ पठाण यांची भेट घेऊन त्यांना हा प्रकार सांगितला.
याबाबत आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादी इक्बाल खान यांनी आयशरचालक आसिफ पठाण याच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे.
