पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २६ वा वर्धापन दिन सोहळा नुकताच श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.खा.
प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष.ना.. सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना.. हसन मुश्रीफ, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.
पक्षाच्या २६ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचे हे यश केवळ पक्षाचे नसून, इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे आहे अशा भावना यावेळी व्यक्त झाल्या
या भव्यदिव्य सोहळ्यात पक्षाचे सर्व सन्माननीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो नागरिकांची लक्षणीय उपस्थिती असून राष्ट्रवादीच्या जनसेवेच्या आणि दूरदृष्टीच्या कार्यावर शिक्कामोर्तब करणारी होती.
यावेळी, मा. अजितदादांनी "शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांशी पक्ष कदापि तडजोड करणार नाही. तसेच, सत्ता हे आमचे ध्येय नसले तरी ध्येयप्राप्तीसाठी सत्ता आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘सत्तेत होतो म्हणून करोडो महिलांना न्याय देऊ शकलो’ असे वक्तव्य पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.श्री. प्रफुलभाई पटेल यांनी केले.
तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजितदादांच्या गेल्या २ वर्षांतील अभूतपूर्व कामाचे कौतुक करत, "आता अजितदादांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे," अशी इच्छा व्यक्त केली. हा सोहळा पक्षाच्या २६ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे आणि भविष्यातील संकल्पाचे प्रतीक ठरणारा होता.
याप्रसंगी, ज्येष्ठ नेते व मा. मंत्री नवाब मलिक, नेते व माजी मंत्री .धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री मा. ना. नरहरी झिरवाळ, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, महिला व बालविकास मंत्री मा. ना. कु. आदिती तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री. ना. मकरंद पाटील, सहकार मंत्री मा. ना.. बाबासाहेब पाटील,, राज्यमंत्री ना.इंद्रनील नाईक, राज्यसभा खासदार सौ. सुनेत्रा पवार, राज्यसभा खासदार, महिला आयोगाच्या अध्यक्षा व पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा मा. सौ. रुपाली चाकणकर, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष.आ. शिवाजी गर्जे, युवा नेते मा.श्री.पार्थ पवार, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, सयाजी शिंदे,युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, यांच्यासह पक्षाचे आमदार,माजी मंत्री, माजी खासदार, माजी आमदार, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
