साई नामाचा जयघोष करत पोलिस निरीक्षक द्वारका डोखेंनी सर केले माउंट लोहत्से शिखर

Cityline Media
0
अहिल्यानगर प्रतिनिधी जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रहिवासी आणि सध्या महाराष्ट्र पोलीस दलात ठाणे,मुंबई येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती द्वारका डोखे यांनी जगातील चौथ्या क्रमांकाचे उंच शिखर, ‘माऊंट लोहत्से’  यशस्वीरित्या सर करून भारताचा तिरंगा आणि श्री साईबाबांचा छायाचित्र असलेली शॉल शिखरावर फडकवली. "साई नामाचा जयघोष" करत त्यांनी केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळवले.
ही मोहीम अत्यंत कठीण आणि धाडसपूर्ण असून, यासाठी अपार शारीरिक व मानसिक तयारी आवश्यक असते. हिमालयातील कठोर हवामान, प्रचंड थंडी आणि कमी ऑक्सिजनच्या आव्हानांना तोंड देत डोखे यांनी आपल्या दृढ श्रद्धा, निष्ठा आणि जिद्दीचे दर्शन घडवले.
भारतात परतल्यानंतर त्यांनी थेट शिर्डी गाठून श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी डोखे म्हणाल्या, “या साहसी मोहिमेची सुरुवात मी शिर्डीच्या दर्शनाने केली होती. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी साईबाबांचे नाव हिमालयात पोहोचवण्याची विनंती केली होती. ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडता आली याचा मला विशेष अभिमान आहे.”

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!