सांगली सिटीलाईन न्यूज नेटवर्क
येथे जिल्हा दौऱ्यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पा.असताना नुकताच 'भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ता मेळावा' पार पडला.या मेळाव्यास संबोधित करुन विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
मा. मंत्री आ.सुरेश खाडे,भाजपाचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री .मकरंद देशपांडे,आ.गोपीचंद पडळकर आ.पृथ्वीराज देशमुख आ.सत्यजीत देशमुख जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक,शहराचे अध्यक्ष प्रकाश ढंग,यांच्यासह आजी माजी पदाधिकरी कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेबाबत सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जागृतपणे लक्ष द्यावे. विधानसभा प्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही शत प्रतिशत भाजप आशा निर्धाराने काम करण्याचे आवाहन केले.
कार्यकर्ता हीच भारतीय जनता पार्टीची खरी ताकद असून ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी तर पार्टीच्या विस्तारात आणि समाजाच्या तळागाळातील घटकात पक्षाची मुळे मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. म्हणूनच या कार्यकर्त्यांची संवाद साधताना विशेष समाधान वाटले असे यावेळी जलसंपदा मंत्री तथा अहमदनगर पालकमंत्री म्हणाले.
