सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माहितीने नागरिकांना दिलासा
नाशिक दिनकर गायकवाड जिल्ह्यातील १६५ पुलांची स्थिती ही भक्कम असून त्याचे परीक्षण करण्यात आलेले आहे. यामध्ये कोणत्याही पुलाला धोका नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच पुणे येथील इंद्रायणी नदीवर असलेल्या लोखंडी पुलावर शेकडो पर्यटक आनंद घेत असताना हा पूल कोसळला होता.त्यानंतर राज्यातील सर्व पुलांचे ऑडिट करण्यासंदर्भा मध्ये राज्य शासनाने निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंडळांना याबाबतचे आदेश देण्यात आलेले होते.
त्यानुसार नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाध्या मंडळाचे जिल्ह्यातील सर्व पुलांची माहिती एकत्रित करून त्याचे पुनर्निरीक्षण म्हणजेच ऑडिट केल्याचे सांगण्यात आले आहे. नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जिल्ह्यातील
पुलांबाबत पुनर्निरीक्षण म्हणजेच ऑडिट के ल्याचा अहवाल मंत्रालयात पाठविण्यात आलेला आहे. त्यामध्ये जिल्ह्यामध्ये १६५ विविध भागांमध्ये पूल असून त्यामध्ये २०० मीटरपर्यंत आठ पूल आहेत.
ते सर्व पूल सुस्थितीत आहेत. ६० ते २०० मीटरपर्यंत ७१ पूल असून त्यांचीही परिस्थिती भक्कम आहे आणि तीस मीटरपासून ६० मीटरपर्यंत ८६ पूल असून त्यांची स्थिती भक्कम आहे. यापैकी कोणत्याही पुलाला पोका नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.म्हणजेच जिल्ह्यातील १६५ पुलांची परिस्थिती बांगली असल्याचे अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
शासनाने दिलेल्या या आदेशाप्रमाणे नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने केलेला हा सर्वेक्षण अहवाल त्या त्या भागामध्ये असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा जिल्हा परिषदेला देणार का याबाबतची कोणतीही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली नसली तरी जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबतची माहिती कळविण्यात आली आहे.
