दोघांचे विचार करण्याची पद्धत वेगवेगळी

Cityline Media
0
पत्नीने मुलांवरील ताबा सोडला आणि परस्पर सहमतीने घटस्फोट झाला 

पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क तेरा वर्षांचा संसार, दोन मुले; पण तरीही कायम स्वरूपी न जुळणारे मतभेद. अखेर दोघांनीही एकमेकांच्या संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. एक वर्षापासून अधिक काळ विभक्त राहत असल्याने पुण्यातील कौटुंबिक न्यायालयाने दाम्पत्यांनी केलेला घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला.घटस्फोट दरम्यान मुलांच्या ताब्याचा प्रश्न निर्माण झाला.मात्र, पत्नीने मुलांवरील ताबा सोडल्याने पतीला मुलांचा ताबा मिळाला अन् घटस्फोटाचा दावा पूर्णपणे मिटला.
प्रकाश आणि प्रीती (दोघांचीही नावे बदललेली) यांचा विवाह २०१० साली झाला. संसाराच्या पहिल्या काही वर्षांत सर्व काही सुरळीत होते. या दरम्यान,त्यांना दोन अपत्येही झाली. मात्र, काही वर्षांपासून दोघांमध्ये मतभेद वाढत गेले. संवाद कमी होत गेला, कुरबुरी वाढत गेल्या. वाद वाढत गेल्याने डिसेंबर २०२३ पासून त्यांनी वेगळे राहण्यास सुरुवात केली. वेगवेगळे राहूनही मतभेद

 समाजात पूर्वी घटस्फोट हा कलंक समजला जात असे. परंतु, आता व्यइक्तस्वातंत्र्य, मानसिक, आरोग्य आणि परिपक्वता, यांच्या दृष्टिकोनातून विभक्त होण्याची निवड केली जाते. नात्यांचा अनादर न करता, परस्पर सन्मान राखून घेतलेला घटस्फोट ही एक जबाबदारीची आणि सजग भूमिका असते.
ॲड. गायत्री कांबळे, पतीच्या वकील
मिटण्याची शक्यता दिसली नाही. त्यामुळे त्यांनी समुपदेशन आणि परस्पर सल्ल्याने कायदेशीर रित्या घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हिंदू विवाह अधिनियम, १९५५ अंतर्गत कलम १३ (ब) अन्वये परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि घटस्फोट मंजूर केला. पतीच्या वतीने ॲड.गायत्री कांबळे यांनी बाजू मांडली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!