नाशिक दिनकर गायकवाड-
नाशिक रोड येथील प्रेस मजदूर संघाचे सरविटणीस तसेच युनी ग्लोबल या आंतरराष्ट्रीय संघटनेचे उपाध्यक्ष जगदीश गोडसे हे इंडोनेशियात होणाऱ्या युनी ग्लोबल आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या बार दिवसीय परिषदेसाठी रवाना झाले.
ही परिषद १३ ते १६ जून दरम्यान इंडोनेशियातील जकार्ता शहरात होणार असून जगभरातील विविध देशांतील कामगार नेते सहभागी होत आहेत. जगदीश गोडसे हे भारतातील नऊ प्रिटींग प्रेस युनिट फेडरेशनचे प्रतिनिधी असून त्यांनी जपान, स्पेन, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, मलेशिया, इटली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेत कामगारांच्या हक्कांचे मुद्दे प्रभावीपणे मांडले आहेत. यंदाच्या परिषदेमध्ये कामगार वर्गाच्या अडचणी, त्यांच्या हकांचे रक्षण
आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहकार्य यावर भर देणार आहेत. वर्क्स कमिटी, आयएसपी सीएनपी मजदूर संघातके जगदीश गोडसे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या या महत्वपूर्ण दौऱ्यामुळे भारतातील कामगार बळवळीला नवी दिशा व उर्जा मिळेल विश्वास संघटनेने व्यक्त केला.
