-एकतर्फी प्रेमातून झालेल्या विवाहितेच्या खुनाचा २४ तासात पोलिसांनी केला उलगडा
-हरसुल पोलीस ठाण्याची कामगिरी
नाशिक दिनकर गायकवाड .२६ जुन २०२५ रोजी रात्री सात साडेसात वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या हरसूल पोलीस ठाणे हद्दीतील खरवळ पैकी विरनगर शिवारात महिला वैशाली नामदेव चव्हाण, वय ४० वर्ष रा. खरवळ पैकी विरनगर ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक ही
कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी वासुदेव देसले तपास करताना
तिच्या झापावरुन गावात चालत येत असतांना ती रस्त्यामध्ये डोक्याला दुखापत होवून जखमी अवस्थेत मिळून आल्याने तिचे नातेवाईकांनी तिला ग्रामिण रुग्णालय हरसूल येथे उपचाराकरीता दाखल केले परंतु डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषीत केले होते.त्यानंतर
सदरची महिला ही राहत असलेला भाग डोंगरळ असून सदर महिला रस्त्यात डोक्यावर पडून जखमी झाली असावी असे तिचे पती नामदेव चव्हाण यांना वाटल्याने त्यांनी हरसुल पोलीस ठाण्याला दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यू रजि. नं. ३६/२०२५ भा.ना.सु.सं. कलम १९४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
सदर मयत महिलेचे शवविच्छेदन केल्यानंतर डॉक्टरांशी पोलीस व मयत महिलेचे पती नामदेव चव्हाण यांनी सल्ला मसलत केल्यावर त्यांची खात्री आली की, वैशाली हिचा कोणीतरी अज्ञात इसमाने खून केला आहे. सदर घटनेच्या काही वेळा अगोदर एक संशयीत इसम एका व्यक्तीचा पत्ता विचारण्याचे बहाण्याने त्यांच्या झापावर आला होता.
हाच इसम मयत वैशाली चालत जात रस्त्याचे दिशेने पात्रत गेल्याचे त्यांचे शेजारी राहणारे इसमांनी पाहिले होते त्यामुळे मयत महिलेचे पती नामदेव चव्हाण यांनी एक अंदाने ३० ते ३५ वर्ष वयाचा व अंदाजे पाच ते साडेपाच फुट उंचीचा, त्याने काळा शर्ट त्यावर पांढरा पट्टा व निळसर रंगाची पॅन्ट पातलेल्या अनोळखो इसमा विरुद्ध हरसुल पोलीस ठाणेस फिर्याद दिल्याने हरसूल पोलीस स्टेशन येथे गुरनं. १४८/२०२५ भा.न्या.से. कलम १०३(१) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा हा महिलांविषयक अती संवेदनशील असल्याने व गुन्ह्याचे घटनास्थळ हे अतीदुर्गम भागात असल्याने घटनास्थळावर आरोपीने त्याची ओळख पटेल असे कोणतेही पुरावे न सोडल्यामुळे गुन्हा उघडकीस आणणे आव्हानात्मक होते.
त्यामुळे नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक. बाळासाहेब पाटील,अपर पोलीस अधीक्षक.आदित्य मिरखेलकर पेठ उपविभागीय पोलीस अधिकारी. वासुदेव देसले यांनी सदर घटनेचा आढावा घेवून नमुद खुनाचा गुन्हा उघडकीस आणणेसाठी तपास पथकास सूचना दिल्या होत्या.
घटनेच्या दिवशी जोरात पाऊस असल्यामुळे घटनास्थळावर कोणताही पुरावा प्राप्त नसतांना केवळ फिर्यादीत नमुद असलेल्या वर्णनाच्या आधारावर हरसुल पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक. चेतन लोखंडे यांनी त्यांचे पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांचे तीन तपास पथक तयार केले.
तसेच पेठ उपविभागीय पोलीस अधिकारी.वासुदेव देसले यांनी तपास पथकांना मुचना देवून तपास पथकासह स्वतः फिर्यादीत नमुद असलेल्या वर्णनाचा कोणता संशयीत इसम घटना घडली त्या दिवशी खरवळ पैकी विरनगर भागात आला होता त्याबाबत खरवळ परिसरात
माहिती घेतली असता इसम नामे भगवान पांडुरंग शिंदे, वय-३ वर्षे, रा. पिंपळपाडा ता. मोखाडा जि. पालघर हा घटनेच्या दिवशी खरवळ पैकी विरनगर गावात आल्याचे व त्याने फिर्यादीत नमुद केलेल्या वर्णनाचे कपडे परिधान केल्याचे तसेच तो शेवटचा कोणाला भेटाला.
याबाबत सविस्तर माहिती घेवून त्या दिशेने तपासाचे चक्रे फिरवुन हरसुल पोलीस ठाण्याचे तपास पथकाने संशयीत इसम नामे भगवान पांडुरंग शिंदे, वय-३४ वर्षे, रा. पिंपळपाडा ता. मोखाडा जि. पालघर याबाबत माहिती घेवून तो आडगाव शिवारात असल्याची त्यांनी
गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन त्यास ताब्यात घेतले.त्यास विश्वासात घेवून वरील खुनाचे गुन्ह्याचे अनुषंगाने त्याचेकडे चौकशी केली असता यातील मयत महिला नामे वैशाली नामदेव चव्हाण हिचेवर आरोपी हा एकतर्फी प्रेम करीत होता. आरोपीने यापूर्वी एक वेळा मयताकडे प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली होतो परंतु तिने त्यास नकार दिला होता तसेच घटनेच्या दिवशी देखील आरोपीने मयत महिलेकडे प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली तेव्हा मयताने त्यास नकार देवून शिवीगाळ करुन त्यास चांगलीच चपराक मारल्यामुळे आरोपीस तिचा राग आल्याने त्याने जवळ पडलेला लाकडी दांडा उचलुन मयताचे डोक्यात जोरात मारुन तिला गंभीर जखमी करून जीवे ठार मारल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपोस गुन्ह्याचे पुढील तपासकामी हरसूल पोलीसांनी त्यास अटक केली आहे.
नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक .बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक. आदित्य मिरखेलकर, पेठ उपविभागीय पोलीस अधिकारी. वासुदेव देसले यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे हरसुल पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक .चेतन लोखंड, पोर्शन, मोहित मोरे, पोलिस उपनिरीक्षक सुनिल आहेर, पोलीस अंमलदार युवराज चव्हाण, रविकिरण पवार, विलास जाधव, हेमंत पवार, मोरेश्वर पिठे, सुनिल ठाकरे, अनिल गांगुर्ड, तुकाराम भोये, भारत खाडे, राजेश काकड, प्रशांत काकड, शामराव फलाणे यांचे पथकाने वरील खुनाचा गुन्हा उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.