नाशिक दिनकर गायकवाड येवला शहर पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने येवल्यातील स्वामी मुक्तानंद विद्यालयासमोर घडक कारवाई करून १८ ते २० गोवंशांची सुटका केली आहे.
संगमनेरहून मालेगावच्या दिशेने १८ ते २० गोवंश कतलीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची गुप्त माहिती येवल्यातील गोरक्षक,बजरंग दल प्राणी फाउंडेशन,विरंगणा नेहा दीदी पटेल यांच्या माध्यमातून संजय शर्मा प्राणी फाउंडेशन जायखेडा सटाणा विंचूर येवला बजरंगी गोरक्षक शिवप्रतिष्तान हिंदुस्थान यांना मिळाली होती.
या गोरक्षकांनी तात्काळ येवला शहर पोलिसांची मदत घेत टूक अडवला मात्र यावेळी ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी कारवाई करत गोवंशाची सुटका केली आहे. दरम्यान या गोवंशांना नजीक असलेल्या गो शाळेत सोडून देण्यात आले.
