नाशिक दिनकर गायकवाड नाशिकरोड ते अंबड सिटी बसच्या प्रवासात एका इसमाचा सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी रमेश बाबूलाल माळी (रा. दरानगर, अंबड) हे नुकतेच सकाळी १० वाजेच्या सुमारास नाशिकरोड बस स्टॉप ते कॉन्टीनेन्टल कंपनी बस स्टॉप, अंबड यादरम्यान सिटी बसने प्रवास करीत होते.त्यावेळी अज्ञात चोरट्याने प्रवासा दरम्यान माळी यांच्याकडे असलेला ५० हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस, २५ हजारांची सोन्याची अंगठी, २५ हजार रुपयांची सोन्याची नथ व दहा हजार रुपये रोख असा एकूण १ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चोरी पाळत ठेवून झाली असल्याचे बोलले जातेय
