नाशिक दिनकर गायकवाड आयपीओ खरेदी करण्याचे आमिष दाखवून चांगले कमिशन मिळत असल्याचे भासवून फिर्यादी व साक्षीदारांची सुमारे ३७ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अज्ञात आरोपींनी फिर्यादी जलिश रोशन कुरेशी (रा. वडाळा रोड, नाशिक) व इतर तक्रारदार यांना निशा अग्रवाल या टेलिग्राम युझर आयडी अनोळखी टेलिग्रामवरून मेसेज करीत असत,तसेच टेलिग्राम पुपमध्ये ॲड करून या ग्रुपवर टास्क विषयी माहिती देऊन व्हाईस कॉल करून ग्रुपमधील निशा अग्रवाल व्हाईस कॉलद्वारे बोलत असे. या ॲपद्वारे फिर्यादीला एअरपान बुकिंगचे रेटिंग दिल्यावर यामध्ये चांगले कमिशन मिळत असल्याचे भासविले, तसेच विविध बँकांच्या खात्यांवर २३ लाख ८७ हजार ९३४ रुपये भरण्यास भाग पाडून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली, तसेच तक्रारदार साक्षी विजय वाघ यांचे पती विजय वाघ यांना एक्स्चेंज ग्रुप ६५ या टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड
करून घेतले व विविध आयपीओचे शेअर्स खरेदी करण्यास सांगून वेळोवेळी ७ लाख २२ हजार रुपये व सचिन दादाजी गवांदे दि. ४ मार्च ते १३ मे दरम्यान व्हॉट्सॲप ग्रुप या अनोळखी व्हॉट्सॲप ग्रुपवरून मेसेज करीत असे.या ग्रुपवर शेअर्स खरेदी-विक्रीविषयी माहिती दिली, तसेच
सुरत मधील रिद्धी शहा नावाच्या महिलेने फिर्यादीला व्हॉट्सॲप क्रमांकावरून विविध कंपन्यांचे शेअर्स व आयपीओ खरेदी करण्याचे आमिष दाखवून वेगळे कमिशन मिळत असल्याचे भासविले. विविध बँकांच्या खात्यांवर एकूण ५ लाख ८० हजार ५०० रुपये भरण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणात फिर्यादी व इतर तक्रारदारांची एकूण ३६ लाख ९० हजार ४३४ रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली. या फसवणुकीसाठी वापरण्यात आलेली टेलिग्राम प्रोफाईल, व्हॉट्सॲप प्रोफाईल, बैंक खाते व वॉलेटधारक, तसेच समन्वय साधणान्या इसमांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक उवळे करीत आहेत.
