गोंदिया सिटीलाईन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर व आदिवासी कल्याण यांच्या माध्यमातून जनजातीय गौरव वर्ष निमित्ताने धरती आबा जनभागिदारी अभियानाचे आयोजन शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा शेंडा येथे करण्यात आले होते.
या अभियानाच्या माध्यमातून रहिवाशी,उत्पन्न,जातीचे दाखले, रेशन कार्ड वाटप,संजय गांधी निराधार योजना,पीएम किसान योजना यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना त्वरित मिळवून देण्याचे उद्दिष्ट शासनाचे आहे.
यावेळी पंचायत समितीचे सभापती .चेतन वळगाये , पंचायत समिती सदस्य अलाउद्दीन राजानी, उपविभागीय अधिकारी.वरूनकुमार शहारे, तहसीलदार सडक अर्जुनी सौ.इंद्रायणी गोमासे,पंचायत समिती मा. उपसभापती .राजेश कठाने,. प्रशांतजी शहारे, नायब तहसीलदार प्रेरणा कटरे, नायब तहसीलदार जांभूळकर, तालुका कृषी अधिकारी श्री.पाठक. वामन लांजेवार,आदिवासी आश्रम शाळा मुख्याध्यापक डॉ संजय गोटमवार आदी मान्यवर उपस्थित होते.
