महानगरपालिकेच्या अनागोंदीमुळे गामने मळ्यात पावसाळ्यात मोठी कसरत

Cityline Media
0
उघडे चेंबर म्हणजे नागरिकांच्या मृत्यूची घंटा

 नाशिक दिनकर गायकवाड -दरवर्षीच्या नेहमीच्या पावसाने येथील मखमलाबादच्या गामने मळा या ठिकाणी येण्या जाण्याचा मार्ग मोठा एकच रस्ता असून गावाकडे जाणारा रस्ता आहे मात्र तो महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यात बंद होतो.
या ठिकाणी पावसाळ्यात अति प्रमाणात पाणी साचले जाते.पाणी साचल्यावर  मनपा कर्मचारी इकडे फिरकत देखील नाही नागरिकांना दळणवळण करताना मोठी कसरत करावी लागते गामणे मळा परिसर खंडेराव मंदिर मधुकर स्वीट या ठिकाणाहून खाली येणारे बाजुला

 चेंबरची संख्या वाढून सिमेंट पाईप पाणी वाहून नेण्यासाठी १२ इंची पेक्षा जास्त असावे जेणेकरून पावसाचे पाणी साचले जाणार नाही व नागरिकांची कसरत होणार नाही या ठिकाणी चार चाकी आणि दुचाकी जास्त प्रमाणात वाहत असलेल्या पाण्यामुळे पुढे जाऊ शकत नाही.

येणाऱ्या जाणाऱ्या वाहनामध्ये पाणी शिरून ते वाहने नादुस्त होतात त्यात उघडे चेंबर असल्यामुळे पायी चालणाऱ्यांना पाण्याचा अंदाज येत नाही ते पादचारी उघड्या चेंबर मध्ये जाऊन मोठी दुर्घटना घडू शकते मात्र महानगरपालिका या रस्त्याबाबत का? टाळाटाळ करत असा संतप्त सवाल येथील नागरिक विचारताना दिसत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!