राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांचा उपस्थितीत पक्षप्रवेश आणि कार्यकर्ता मेळावा उत्साहात

Cityline Media
0
पुणे सिटीलाईन न्युज नेटवर्क महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजित पवार  यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच जाहीर पक्षप्रवेश आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला.यावेळी, अजितदादांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि मा. नगरसेवक- नगरसेविका, कार्यकर्ते यांचा शहरातील प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थितीत कै.अंकुशराव लांडगे, सभागृह, भोसरी, पुणे येथे जाहीर पक्ष प्रवेश झाला.
यावेळी, मा. अजितदादांनी या सर्वांचे पक्षात मनापासून स्वागत करत त्यांना पुढील यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

 अजि पवारांनी या पक्षप्रवेशानंतर सर्व उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हटले की, "जसं बारामतीकरांनी मला अमाप प्रेम दिलं तसंच प्रेम मला पिंपरी चिंचवडकरांनी देखील दिलं.मी पहिल्यांदा खासदार झालो तेव्हा मला तुम्ही प्रचंड मोठं पाठबळ दिलं. आपण कामाची माणसं आहोत, आपल्याला अजून काम करायचं आहे. आज प्रवेश केलेल्या तुम्हा सर्वांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढली आहे. तसेच, निष्ठावतांवर देखील आमची निष्ठा आहेच."
"सर्वसामान्य लोक कामाला महत्व देतात त्यामुळे आपण कामाला कमी पडायचं नाही. आज या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने अनेक समस्यांचा उहापोह झाला. श्री. अजित गव्हाणेंनी आता मांडलेल्या सर्व प्रश्नांवर देखील मी लक्ष ठेवून आहे. आपण यासंदर्भात काहीही काळजी करू नका. तसेच, शहराचा विकास करत असताना किती झपाट्याने ही शहरे वाढतायत याचाही विचार करणं आपल्याला आवश्यक आहे. या शहरांच्या वैभवात भर पडेल असंच काम आम्ही केलं आहे", असेही मा. अजितदादा म्हणाले.

तसेच, यावेळी भाषणाच्या सुरुवातीला अजित पवारांनी अहमदाबाद विमान दुर्घटना आणि कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली

या वेळी महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, पिंपरी चिंचवड जिल्हाध्यक्ष. योगेश बहल, पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेता. नाना काटे, महिला शहराध्यक्षा श्रीमती. कविता आल्हाट यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!