मुंबई सिटीलाईन न्युज नेटवर्क राज्यातील शिक्षण विभागाच्या पुढील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आज नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांची आमदार सत्यजित तांबे यांनी मुंबईत मंत्रालयात भेट घेतली. यावेळी आ. किरण सरनाईक, आ.जयंत आसगावकर आणि आ. किशोर दराडे हे देखील उपस्थित होते.
प्रसंगी राज्यातील शिक्षण विभागाचे पुढील विविध प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडत त्यांच्याशी चर्चा केली. दि.१४ऑक्टोबर२०२४ च्या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या पुढील टप्प्यासाठी निधीची तरतूद करणे राज्यातील १ नोव्हेंबर २०२५ पूर्वी नियुक्त व त्यानंतर १००% अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंन्शन योजना लागू करणे.राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील आयटी विषयाच्या शिक्षकांना मान्यता देऊन अनुदान घोषित करणे राज्यातील महाविद्यालयांमधील प्रलंबित प्राध्यापक भरतीबाबत निर्णय घेणे.हे सर्व प्रश्न मांडत या सर्व प्रश्नांबाबत लक्ष घालण्याची त्यांना विनंती केली. यासंदर्भात नक्की लक्ष घालणार असल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमदार सत्यजित तांबे यांना दिले.
