वरवंडी संपत भोसले संगमनेर तालुक्यातील पिंप्रीलौकी अजमपूर,येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक.तायगा मल्लू शिंदे यांना सेवा कार्य गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
मराठी भाषेच्या निरंतर सेवा,प्रचार,प्रसार कार्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. श्रीरामपूर येथील इच्छामणी मंगल कार्यालय मध्ये राज्यस्तरीय दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन पार पडले. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे मराठी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संदीप सांगळे तसेच ह.भ.प. प्रा.डॉ. वसंतराव शेंडगे यांच्या हस्ते. तायगा शिंदे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शिंदे हे भटकंती करणारे वैदू समाजातील असून समाजातील पहिले मुख्याध्यापक आहेत.महाराष्ट्र वैदू समाज जातपंचायत मढी, पाथर्डी यात त्यांचे योगदान आहे. मढी येथील वैदू समाज जातपंचायत मध्ये मुलामुलींना किमान दहावी पर्यंत शिकविणे, हुंडा पध्दत बंद करून लग्न खर्च वधुवर पक्षाने समान करावा असे क्रांतिकारी ठराव करून वैदू समाजात अंमलात आणले आहेत. त्यांची कन्या वर्षा शिंदे यासुद्धा पद्मभूषण विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत शिक्षिका असून समाजातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत. प्रवरा माध्यमिक विद्यालय पिंप्रीलौकी अजमपूर येथे त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला असून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विद्यालयात विविध उपक्रम ते राबवीत आहेत.
शिंदे यांना विद्यार्थी दशेपासूनच मा.खासदार दिवंगत. बाळासाहेब विखे पाटील व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा.यांचे सहाय्य व मार्गदर्शन लाभले यामुळेच हे यश मिळाले असे शिंदे यांनी सांगितले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे