राहाता प्रतिनिधी तालुक्यातील बाभळेश्वर येथील बाळ येशू चर्च, व भोसले प्रतिष्ठान, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ६ जुलै रोजी अहमदनगर जिल्ह्यातील बाभळेश्वरच्या बाळ येशू चर्च मध्ये दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत १६२ व्या ख्रिस्ती वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक श्रीधर भोसले यांनी दिली.
आयोजित या सामाजिक उपक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून रेव्ह.फादर मायकल वाघमारे, रेव्ह.फादर संजय पंडित,पास्टर पौलस पराड, सुरेश भिंगारदिवे , ॲड. कल्याणी होले/बनसोडे, योगेश वाघमारे आणि युवा प्रतिम पारखे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात शिक्षित, उच्च शिक्षित, अविवाहीत, विधवा, विधुर, घटस्फोटीत आणि अपंग असे सर्व पंथीय विवाहेच्छुक उपस्थित राहणार आहेत.अनेक पालकांच्या मागणी वरून आयोजित केलेल्या या मेळाव्यास आपल्या मुला मुलींसह वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक श्रीधर भोसले, पुणे (मो. 7083922052) यांनी केले आहे.
अधिक माहिती साठी खालील नंबरवर संपर्क करावा 9730119097 9822258403 असे आवाहन करण्यात आले आहे.