मराठा समाजाची आचारसंहिता जाहीर;अंमलबजावणीसाठी ११ जणांची सुकाणू समिती
अहिल्यानगर, प्नतिनिधी मराठा समाजाने विवाह समारंभासाठी आचारसंहिता जाहीर केली आहे. हंडा घेऊ नका, देऊ नका, तसेच लग्नात डिजे व प्री-वेडिंगला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विवाह सोहळा केवळ १०० ते २०० लोकांच्या उपस्थितीत पार पाडावा, असे महत्त्वाचे निर्णय मराठा समाजाने घेतल्याने चंगळवादाला रोख लागुन चांगला पायंडा निर्माण झाला असुन या निर्णयाचे वंचित मराठा समाजाकडून स्वागत होत आहे.
आचारसंहितेचे पालन उत्कृष्टपणे करणाऱ्या तीन पालकांचा समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे, तसेच आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी ११ जणांची सुकाणू समिती देखील स्थापन करण्यात आली आहे.
नगरमधील हॉटेल सुवर्णम प्राईड येथे बद्रिनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी मराठा समाजाच्या अनेक लग्न समारंभात छत्रपती शिवरायांची आरती करण्याची प्रथा रूढ होत आहे. ही प्रथा तत्काळ बंद करावी, अशी मागणी सी. ए. ज्ञानेश्वर काळे यांनी यावेळी केली. शिवराय हे आपले दैवत आहेत. त्यांना देवत्व बहाल करू नये.स्वराज्याची निर्मिती करताना त्यांनी केलेला पराक्रम प्रेरणादायी आहे. त्यांची आरती कुणीही करू नये.नाहीतर काही वर्षांनी त्यांचा पराक्रम पुसला जाईल व त्यांना देवत्व बहाल केले जाईल.महाराजांची आरती कोणीही कुठेही लावू नये अथवा ऐकू नये, अशी विनंतीही काळे यांनी केली.
बैठकीचे आयोजन एन. बी. धुमाळ फाउंडेशनने केले होते. यावेळी माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, सकल मराठाचे अध्यक्ष चंद्रकांत गाडे, अखिल भारतीय मराठा संघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे, जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य
कार्याध्यक्ष राजश्री शितोळे, पत्रकार किशोर मरकड, मराठा वधू-वर सूचक मंडळाचे अशोक कुटे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, विठ्ठल गुंजाळ, सी. ए. ज्ञानेश्वर काळे आदींसह समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
तनपुरे महाराज म्हणाले, समाजाने अनिष्ट रूढींना तिलांजली द्यावी.
आचारसंहिता
-१०० ते २०० लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा
डीजे नको,पारंपरिक वाद्य आणि लोक कलावंतांना पसंती
-प्री वेडिंग बंद करावे, केलेच तर जाहीर दाखवू नये
नवरा-नवरीला हार घालताना वर उचलून घेऊ नये
कर्ज काढून लग्नात खर्च करू नये
नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण-तरुणींना पायबंद घालावा
समाजात बदल करण्यासाठी प्रत्येकाने प्रथम बदल करावा. सर्वांनी एकत्र येऊन लग्न समारंभातील आचारसंहितेची अंमलबजावणी करावी,त्यासाठी तालुकावार समिती स्थापन करण्यात यावी.
डॉ. निमसे म्हणाले, लग्नसोहळ्याच्या आचारसंहितेची
लग्नात फक्त वधूपिता आणि ७ वरपिता यांनीच फेटे बांधावेत
भेटवस्तू ऐवजी पुस्तके, झाडाची रोपे किंवा रोख आहेर करावेत.देखावा करू नये, लग्नात हुंडा देऊ घेऊ नये.
इच्छा असेल, तर मुलीच्या नावावर एफडी करावी
जेवणात ५ पेक्षा जास्त पदार्थ नकोत
लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी करावी
१३ दशक्रिया विधी पाचव्या दिवशी करावा
जनजागृती घेण्यासाठी कीर्तनकार, प्रबोधनकारांनी पुढाकार घ्यावा. हुंडाबळी याबरोबरच समाजातील ग्रामीण मुलांच्या विवाहाचीही समस्या मोठी आहे. यावरही गांभीयनि विचार करावा लागेल. प्रास्ताविक उद्योजक एन. बी. धुमाळ यांनी केले. प्रा. दशरथ खोसे यांनी आभार मानले.
