व्यावसायिकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याने पाच जणांना अटक
नाशिक दिनकर गायकवाड एक सव्वा लाख रुपयांची उधारी मागितल्याचा राग आल्याने एकाच कुटुंबातील आठ ते दहा जणांनी एका व्यावसायिकाला बेदम मारहाण करून त्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की फिर्यादी सॅमसन जेकब नाहर (रा. मातोश्री कॉलनी, खोजेनगर, नाशिक) यांचे चॉक्लेट, बिस्कीट, चिकू होलसेल विक्रीचे दुकान आहे.नाहर यांनी आरोपी इलियास शेख, सद्दाम शेख, अजहर शेख, अमजद शेख,अजहरची आई इतर दोन ते तीन नातेवाईकांकडे असलेल्याचे उधारीचे १ लाख २० हजार रुपये मागितले.
त्याचा राग आल्याने सर्व आरोपींनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या दुकानात आले.तेथे सामानाची तोडफोड करून व्यवस्थापक जय कोडी, कामगार श्रीनिवास यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच दुकानातील काठीने एका महिलेने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण केली.
सदाम शेख याने फिर्यादीच्या पत्नीचा हात धरून तिचा विनयभंग केला, तरीच फिर्यादी नाहार यांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये येऊन जात तेथे ॲक्सिडेंट झाला आहे, असे सांग, नाही तर तुला धंदा करू देणार नाही, असा दम दिला आहे. हा प्रकार दि. ३१ मे रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास फिर्यादीच्या द्वारका येथे असलेल्या राना स्वीट्स दुकानात चहला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन पाथ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
