श्रीरामपूर दिपक कदम श्रीरामपुरात दाखल झालेल्या दिंडीचे स्वागत करताना ख्रिस्त राजा चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर आब्राहाम रणनवरे, सिस्टर निलमनी, सिस्टर क्विनीटा (प्रिन्सिपल), सिस्टर रिफीला व सिस्टर आनुषा यांनी आपली प्रेमपूर्वक उपस्थिती दाखवून वारकऱ्यांचे स्वागत केले.
या प्रसंगी ख्रिस्ती धर्मातील सर्व धर्मभाव सहिष्णुता व मानवतेचे आदर्श पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले. ख्रिस्ती विचारसरणीत "सर्वधर्म समभाव" ही केवळ संकल्पना नसून ती जीवनपद्धती आहे. ईश्वरी प्रेम, सेवा आणि बंधुता यावर आधारित ही परंपरा प्रत्येक धर्माच्या आदरात व्यक्त होते.दिंडीचे स्वागत हे केवळ एक औपचारिक क्षण नव्हता,तर तो एका सार्वत्रिक आध्यात्मिक एकतेचा संदेश होता—जिथे संस्कृती, श्रद्धा आणि मानवता एकत्र नांदतात.
