सरला बेट धामच्या दिंडी मधील वारकऱ्यांचे चोरी गेलेले महागडे मोबाईल दोन तासात जप्त

Cityline Media
0
श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी.

श्रीरामपूर दिपक कदम नुकतेच.पहाटेच्या सुमारास सरला बेट धाम दिंडीतील वारकरी हे आरामाकरीता स्वयंवर मंगल कार्यालय श्रीरामपूर येथे थांबलेले असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने चार्जिगला लावलेले तीन मोबाईल चोरुन नेले होते परंतु श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष पोलिसांनी या मोबाईलचा दोन तासाच्या आत शोध लावला असून वारकऱ्यांकडे सुपुर्त केले आहे.
सदर घटनेबाबत पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना माहिती मिळताच त्यांनी तपास पथकास वारकाऱ्यांचे चोरी गेलेले मोबाईल व सदरचा अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकांने तात्काळ सदर ठिकाणी जावुन घटनास्थळाची पाहणी व तांत्रिक विश्लेषण केले असता.

 सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी नामे १) किरण जगन्नाथ चिकणे, रा. वॉर्ड नं.६,श्रीरामपूर याने केल्याचे निष्पण झाल्याने सदर आरोपीताचा त्याचे राहते घरी शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्याच्याकडुन वारकऱ्याचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले.

महागड्या किंमतीचे मोबाईल दोन तासाच्या आत जप्त करण्यात आले असुन आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्यात आले असुन पुढील कारवाई करत आहोत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे, नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलिस हेड कॉन्स्टेबल अमोल गायकवाड, पो.हेड कॉन्स्टेबल अमोल पडोळे, मच्छिंद्र कातखडे,संभाजी खरात, अजित पटारे,आजिनाथ आंधळे,सांगर बनसोडे, रामेश्वर तारडे, यांनी केली असुन पुढील कायदेशीर कारवाई श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!