इंदूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क-राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सोनम रघुवंशी आणि इतर चार आरोपी पोलीस कोठडीत आहेत. मेघालय पोलिसांनी त्यांना सोबत घेतले असून तपासा दरम्यान अनेक धक्कादायक सत्य समोर येत आहेत. ज्या दिवशी सोनमने पतीसाठी व्रत ठेवले होते, त्याच दिवशी तिने तिच्या पतीची हत्या केली. योजनेनुसार, राजा रघुवंशीला धबधब्याच्या जवळ मारायचे होते.
यादरम्यान, कॉन्ट्रॅक्ट किलर्स पायऱ्या चढून थकले होते, म्हणून ते राजाला धबधब्याजवळ मारण्यास नकार देत होते. त्यानंतर सोनम त्यांच्यावर खेकसली की त्यांना त्याला मारावेच लागेल. मी २० लाख रुपये देईन, असेही सोनम त्यांना म्हणाली. या सगळ्या गोष्टींचा खुलासा आरोपींनी केला आहे. पोलीस चौकशीत या बाबी समोर येत आहेत.
