नाशिक दिनकर गायकवाड महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या घटलेल्या पटसंख्येमुळे धास्तावलेल्या महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शहरात अनधिकृत शाळा सुरू झाल्या नाही ना? याची तपासणी करीत शोध घेण्याच्या सूचना प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी पर्यवेक्षकांना दिल्या आहेत.
मनपाच्या शहरातील चोवीस केंद्रांमध्ये कुठे अनधिकृत शाळा आहेत का?याचा शोध घेण्यात येणार असून त्यानुसार मनपाच्या शिक्षण विभागाकडून ही शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.शहरात काल देखील विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. शहरात महापालिकेच्या १०२ शाळा आहेत. अनधिकृत शाळांमुळे विद्याथ्यांचे भविष्य अंधारमय होऊ शकते. त्यामुळे अशा शाळांचा शोध घेतला जात आहे.पालकांनी पाल्याचे प्रवेश अनधिकृत शाळांमध्ये करु नये
शहरात अनधिकृत शाळा आहेत की नाही,याबाबत पर्यवेक्षकांना तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत, चोवीस केंद्र असून, प्रत्येक केंद्रात तपासणी करण्यात येणार आहे. कुठे अशा प्रकारच्या शाळा सुरू असल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल. - स्मिता चौधरी,
शिक्षणाधिकारी,महानगर पालिका,नाशिक.
पालकांनी मान्यताप्राप्त शाळेचाच आग्करह धरावा यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जातात. त्यानुसारच यंदाही मनपा शिक्षण विभागाने त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. दोन आठवधांपूर्वी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी मिता चौधरी यांची मनपाच्या शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. अनधिकृत शाळा आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच तेथील विद्याथ्यचि समायोजन मान्यताप्राप्त शाळेत केले जाईल,असेही चौधरी यांनी सांगितले.
