नाशिक दिनकर गायकवाड- वाहन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात नाशिकच्या एजंटने अकोल्याच्या पत्रकाराची साडेसहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी भाऊसाहेब भागुजी आंबरे (रा. गणोरे, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) हे पत्रकार आहेत.आरोपी मोहंमद जाकीर इब्राहिम शेख (रा. दातार मोटर्स, पखाल रोड, नाशिक) हे जुने वाहन खरेदी-विक्रीचे एजंट आहेत. त्यांनी फिर्यादी आंबरे यांचा विश्वास संपादन करून एमएच १५ जीव्ही ८१८७ या क्रमांकाची पिकअप गाडी ६ लाख ५५ हजार रुपयांत
फिर्यादीला विक्री करून फिर्यादीकडून रोख रक्कम ४ लाख ७० रुपये घेऊन करारनामा करून दिला.त्यानंतर ३० हजार रुपये फोन पेवर घेऊन गाडीवरील महेंद्र फायनान्सचे बाकीचे कर्ज रक्कम मी भरतो,असे म्हणून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.त्यानंतर ती रक्कम आरोपीने न भरल्याने फिर्यादी आंबरे यांनी घेतलेली पिकअप गाडी फायनान्सवाले घेऊन गेले. याबाबत फिर्यादी यांनी आरोपीला सांगितले असता त्याने दमदाटी करून शिवीगाळ केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आरोपी एजंट महंमद शेखविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
