ऑनलाईन आढावा बैठकीत प्रधान सचिवांनी दिल्या सूचना
नाशिक दिनकर गायकवाड शहरात काही वर्षात सिमेंटच्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या जंगलामुळे शहरातील वृक्षसंपदा दिवसेंदिवस कमी होत आहे.या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महाराष्ट्रातील प्रमुख -महापालिका क्षेत्रांतील झाडांची संख्या कमी होत असल्याचे पाहून -संवर्धनासाठी स्वतः पुढाकार घेतला असून नाशिक महानगर पालिकेला पावसाळ्यात एक - लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले
शासकीय, निमशासकीय - कार्यालये, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, वृक्षप्रेमी यांच्या मदतीने एक लाख रोपांची लागवड केली जाणार आहे. राज्याचे
प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत ऑनलाइन बैठक घेतली.गतवर्षी महापालिकेच्या उद्यान विभागाने शहरात ८५ हजार रोपांची लागवड केली. परंतु चार महिन्यांच्या कालावधीत विविध प्रजातींच्या रोपांची लागवड केली जाणार आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे सध्या रोपे नसल्याने वन विभागाकडून रोपे विकत घ्यावी लागणार आहेत. रोपांची गुणवत्ता पाहून प्रति रोप वीस ते तीस रुपये याप्रमाणे विकत घ्यावे लागणार आहे दरम्यान,नाशिकची ओळख गुलशनाबाद अशी होती. येथील फुलांसह संपदेने शहर
शहरातील सहाही विभागांत एक लाख रोपांची लागवड उद्यान विभागाकडून केली जाणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. आमच्याकडे रोपे नसल्याने वन विभागाकडून ती विकत घेतली जाणार आहेत. कडुलिंब, पिंपळ, उंबर आर्टीसह देशी प्रजातीच्या रोपांबी लागवड करण्यात येणार आहे. नाशिककरांनी या उपक्रमात भाग घ्यावा.
विवेक भदाणे
उद्यान अधीक्षक, मनपा, नाशिक
बहरलेले असल्याने शहरातील वातावरण आल्हाददायक होते. परंतु गेल्या दहा ते पंधरा वर्षात वृक्षसंपदा कमालीची घटल्याचा दावा वृक्षाप्रेमींकडून केला जात आहे.सिमेंटच्या जंगलासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाला हाताशी धरून सरांस वृक्षतोड केली जाते, असा आरोप महापालिकेवर होत आहे.
प्रधान सचिवांनी सूचना केल्यानंतर मनपा मनपाच्या उद्यान विभागाने वृक्ष लागवडीचे नियोजन सुरू केले आहे.नाशिकरोड, पंचवटी, सातपूर, नवीन नाशिक, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम या सहा विभागांत प्रत्येकी पंधरा ते सतरा हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असेल असेही सांगण्यात आले आहे
