संगमनेर नितीनचंद्र भालेराव हिवरगांव पावसा गावच्या धार्मिक,सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असणारे ज्येष्ठ मार्गदर्शक सेवा निवृत्त शिक्षक सिताराम लक्ष्मण गडाख (गुरुजी)यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे देवरगाव येथे आयोजन करण्यात आले असून या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त समाज प्रबोधनकार.राधेश्याम महाराज पाडांगळे (टाकळीभान) यांचे प्रवचन आज दिनांक ४ जून रोजी सायं.६.३० वा.आयोजन करण्यात आले आहे.
या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यास मा.महसुल मंत्री बाळासाहेब थोरात,खासदार भाऊसाहेब वाकचौरे,
नाशिक पदवीधर मतदार संघाचे मा.आ.डॉ.सुधीर तांबे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव,राजहंस दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख
एकविरा फाऊंडेशन अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात,स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष शरद थोरात,पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते,शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी, पेन्शनर्स संघटनेचे अध्यक्ष
सोमनाथ कळसकर गुरुजी,संगमनेर सह.साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले,संगमनेर साखर कारखान्याचे माजी संचालक शांताराम काढणे,काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष अर्चना बलोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
सिताराम लक्ष्मण गडाख गुरुजी यांचा जन्म ४ जून १९४९ रोजी हिवरगाव पावसा येथे झाला.आई भिमाबाई व वडील लक्ष्मण गडाख यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून घेत सिताराम गडाख गुरुजी यांना जुनी अकरावी, डी.एड पर्यंत शिकविले.त्यानंतर सिताराम गडाख गुरुजी जिल्हा परिषद अहमदनगर येथे शिक्षण सेवेत रुजू झाले.
नोव्हेंबर १९७३ मध्ये संगमनेर तालुक्यातील वनकुटे या गावातून शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करण्यास प्रारंभ केला.वनकुटे या गावामध्ये १९७३ ते ७९ सहा वर्ष ज्ञानदानाचे कार्य केले त्यानंतर सावरगाव तळ येथे सहा वर्ष,झोळे येथे बारा वर्ष, शिरापूर येथे दहा वर्ष शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य केले तर चंदनापुरी केंद्र शाळा येथे मुख्याध्यापक म्हणून एक वर्ष सेवा केली आणि तेथेच सन २००८ मध्ये सेवानिवृत्ती झाले.
विशेष म्हणजे सुरुवातीपासून पाचवी ते सातवीच्या वर्गामध्ये ज्ञानदानाचे कार्य केले.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी,अभ्यासातील गुणवत्ता वाढीसाठी सतत उपक्रम राबविण्यासाठी गुरुजीनी सहभाग घेतला. सिताराम गडाख गुरुजी यांनी वृक्षारोपण उपक्रमास ८०च्या दशकात विशेष लक्ष दिले.झोळे या गावात
१९८५ ते ९७ शिरापूर येथे १९९७ ते २००७ या कालखंडात या कालावधीत मोठ्या प्रमाणात शालेय परिसरात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन उपक्रम राबविला तसेच विज्ञान प्रदर्शन क्रीडा स्पर्धा यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागासाठी प्रोत्साहन देत असत.
सन २००८ मध्ये सेवानिवृत्ती झाले.हिवरगाव पावसा येथे रोज सायंकाळी हनुमान मंदिरात हरिपाठ घेतला जातो.त्यामध्ये गुरुजींचा मोठा सहभाग असतो तसेच आळंदी,त्र्यंबकेश्वर, पंढरपूर,पैठण या ठिकाणी पायी दिंडीमध्ये सहभागी होऊन अनेक वेळा वारीत सहभाग घेतला आहे. सन २००९ पासून नियमित वारीमध्ये सहभाग घेत आहेत.
भजनी मंडळाच्या भजनाच्या कार्यक्रमात गुरुजींचा सहभाग अग्रभागी असतात रामनवमी, हनुमान जयंती, धुलीवंदन, तुकाराम महाराज बीज,सप्ताह निमित्त कार्यक्रमात मोठा सहभाग नेहमीच असतो.
कौटुंबिक जीवनात गुरुजींनी शिस्त व संस्काराला महत्त्व दिले आहे.गुरुजींचे दोन्ही मुले उत्कृष्टरित्या प्रगतशील शेतकरी ओळखले जातात.गडाख गुरुजी यांनी कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून माळ रानावर नंदनवन फुलविले आहे.या कामी गुरुजींचे दोन्ही मुले गणेश व सुरेश तसेच पत्नी सुलोचना यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.
मुलगी कविता विजय पोटे या मुंबई येथे स्थायिक आहे.जावई यांची नवी मुंबई बाजार समिती येथे कमिशन एजंट एजन्सी आहे. सदर एजन्सी मार्फत डाळिंब आंबा यांचे खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात केले जाते.अशा प्रकारे कुटुंबातील व्यक्ती नोकरी व्यवसाय बरोबर सामाजिक बांधिलकी जपत आहे.
गुरुजी शैक्षणिक,सामाजिक,धार्मिक कार्य अग्रेसर असणाऱ्या सिताराम गडाख गुरुजी यांना ७५ व्या अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक,राजकीय, शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन हिवरगाव पावसा येथील सर्व संस्था पदाधिकारी ग्रामस्थ यांनी केले आहे.
