संगमनेर नगरपालिकेतील ठेकेदारांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करा

Cityline Media
0
आमदार अमोल खताळ यांचे मुख्याधिकाऱ्यांना सक्त निर्देश

-दिल्ली नाका येथे  गटार काँक्रिटीकरण सुधारणा तसेच सर्व्हिस रोड तयार करणे
कामाचा शुभारंभ

 
संगमनेर महेश भोसले-संगमनेर नगरपालिकेत अनेक वर्षांपासून कचरा व्यवस्थापन, गटारी स्वच्छता आणि रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून दोषी ठेकेदारांविरुद्ध कारवाई करा असे सक्त आदेश आमदार अमोल खताळ यांनी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना दिले.
संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथे नागरी दलीतेत्तर वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात भूमिगत गटार काँक्रिटीकरण सुधारणा तसेच सर्व्हिस रोड तयार करणे कामाचे भूमिपूजन आमदार खताळ यांच्या हस्ते रविवारी सकाळी करण्यात आले त्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर मा.उपनगराध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जावेद जहागीरदार, माजी नगरंसेवक ॲड. श्रीराम गणपुले, ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे, शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे ,विनोद सूर्यवंशी तालुका प्रमुख रामभाऊ राहणे , रिपाइंचे शहराध्यक्ष कैलास कासार,भाजपचे ज्येष्ठ नेते दादा भाऊ गुंजाळ, रोहित चौधरी, वरद बागुल, ऋषिकेश मुळे सौरभ देशमुख राहुल भोईर गोकुळ दिघे ,नासिर शेख ,बबलू काझी,मजहर शेख,मुझफ्फर जहागीरदार सौ. कांचन ढोरे , सौ. मेघा भगत, रेश्मा खांडरे उषा कपिले,मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार खताळ पुढे म्हणाले की ,गेल्या ३० वर्षांपासून नगरपालिकेवर तुमची सत्ता होती  तेव्हा गटारीचे आणि  रस्त्याच्या कामाचे ठेके तुमच्या ठेकेदाराला दिले. मोर्चा काढायला सुद्धा तेच ठेकेदार पुढे होते. संगमनेर नगरपालिकेत त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याने या बाबतची  माहिती माझ्या कार्यालयात द्या त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर बैठक घेऊन भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्यास भाग पाडू असाही विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला.

दिल्ली नाका परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी  सर्विस रस्ता होणे गरजेचे आहे असा आग्रह आपण पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे धरला होता त्यांनी तात्काळ नागरी दलीतेत्तर वस्ती सुधार योजनेतुन  १ कोटी ५१ लाख ६९ हजार रुपये मंजूर केले या निधीतून कामाची सुरुवात करण्यात आली आहे .ठेकेदाराने हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. न खाऊंगा, ना खाने दूंगा” ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली तीच भूमिका आपण संगमनेर येथील विकास कामांबाबत घेत आहे. ठेकेदाराने हे काम वेळेत पूर्ण करावे . या कामांचा दर्जा उत्तम राहील याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे. मला माझ्या कुटुंबातील कुणाला राजकारणात आणायचे नाही. मला ज्ञफक्त लोकांचे प्रेम आणि विश्वास हवा आहे, त्यामुळे विकास कामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजे असे त्यांनी ठेकेदारांना ठणकावून सांगितले .यावेळी माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार, माजी नगरसेवक शिरीष मुळे, मजहर शेख यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली सूत्रसंचालन अजित जाधव यांनी केले.प्रस्ताविक संगमनेर नगर पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी केले तर आभार नगर अभियंता प्रशांत जुन्नरे यांनी मानले.

  एसटीपी प्लांट बाबत स्पष्ट भूमिका
-संगमनेर शहरात एसटीपी प्लांट उभा करण्याचा काहींनी घाट घातला आहे मात्र तो प्लांट इतरत्र हलविण्यासाठी मी तुमच्याबरोबर राहील. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे निधी आणण्यासाठी आणि विकासाचा  वेग साधण्यासाठी  आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विकासाभिमुख उमेदवार निवडून द्या 

आमदार अमोल खताळ 
सदस्य संगमनेर विधानसभा
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!