आश्वी प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील जुन्या पिढीतील धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले गणपत सयाजी कांबळे यांचे नुकतेच वृध्दपकाळाने निधन झाले मृत्यु समयी त्यांचे वय ८९ वर्ष होते .
त्यांच्या पश्चात तिन मुले सुना मुलगी जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.समाज प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले विजय कांबळे विश्वनाथ कांबळे राजेंद्र कांबळे यांचे ते वडील तर संचित कांबळे बाळासाहेब कांबळे राहुल कांबळे प्रतिक कांबळे अमोल कांबळे ज्ञानेश्वर कांबळे यांचे ते आजोबा होत त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.