सांगली सिटीलाईन न्यूज नेटवर्क जलसंपदा विभागांतर्गत सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांची सद्यस्थिती व पूर व्यवस्थापनाबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या उपस्थितीत येथील शासकीय विश्रागृहात विस्तृत बैठक घेत आढावा घेण्यात आली.आढावा बैठकीत लोकप्रतिधीनी मांडलेल्या समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना यावेळी जनसंपदा मंत्र्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी पूर नियंत्रणाबाबतही बैठकीत प्राधन्याने चर्चा झाली.यावर उपाय योजना करण्यासाठी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम करावे,अशा स्पष्ट सूचना दिल्या.शिवाय अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या मुद्याबाबत सर्वांची मतं जाणून घेत शासनाची भूमिका स्पष्ट केली.
बैठकीस मा. मंत्री व विद्यमान आमदार सर्वश्री डॉ.सुरेश खाडे, आमदार.गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजीत देशमुख, आमदार सुहास बाबर, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता. हणमंत गुणाले, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सी.एच. पाटोळे, कोल्हापूर विभागाचे अधीक्षक अभियंता.अभिजीत म्हेत्रे, माजी खासदार. संजय पाटील, मा.आ.पृथ्वीराज देशमुख, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी होल्डींग कंपनीच्या स्वतंत्र संचालिका नीता केळकर आदींसह विविध पदाधिकारी, पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
