संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथील घटनेने;जिल्ह्यात संताप
वरवंडी संपत भोसले आमच्या वावरात शौचालयास का?बसले या कारणावरून संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथे एका २८ वर्षीय महिलेचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. तर मृत महिलेची नणंद या घटनेत गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.आहे.
रूपाली ज्ञानदेव वाघ असे खून झालेल्या महिलेचे नाव असून मोनिका वाघ असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकाराने तालुक्याचा पठार भाग हादरला आहे.तर जिल्हाभरात या प्रकरणावरून संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यातील कर्जुले पठार येथील रहिवासी अजित दादाभाऊ वाघ यांनी घारगाव पोलिस ठाण्यात
फिर्याद दिली.घरात शौचालय नसल्याने वाघ कुटुंबीय अनेकदा मुरलीधर पडवळ यांच्या शेतात शौचालयासाठी
शेतात शौचालयास.जात असे.
मंगळवार दि.१० जून रोजी सायंकाळच्या सुमारास अजित वाघ यांची वहिनी रूपाली ज्ञानदेव वाघ या शौचालयासाठी पडवळ यांच्या शेतात गेल्या होत्या. त्यावेळी विक्रम पडवळ तिथे आला आणि त्याने रूपाली यांना तुम्ही आमच्या शेतात शौचालयासाठी का जाता? असे म्हणत शिवीगाळ केली. या घटनेनंतर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अजित वाघ त्यांचा भाऊ ज्ञानदेव वाघ,वहिनी रूपाली वाघ आणि बहिण मोनिका दादाभाऊ वाघ हे विक्रम पडवळ यांच्या घरी त्यांना समजावून सांगण्यासाठी गेले असता विक्रम पडवळ, मुरलीपर पडवळ आणि अलका पडवळ यांनी त्यांना शिवीगाळ केली व वाघ कुटुंबीयांनी आपली चूक झाली म्हणत माफी मागतो असे सांगितले. मात्र मुरलीधर पडवळ याने जातीवाचक शिवीगाळ केली तसेच संताप अनावर झालेल्या विक्रम पडवळ याने आता तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे म्हणत घरातून चाकू आणला. अलका पडवळ हिने रूपाली वाघ हिचे हात भरले आणि विक्रम पडवळ याने रूपाली वाघ हिच्या पोटात डाव्या बाजूला चाकूने वार केले. त्यावेळी रूपाली हिला वाचण्यासाठी तिची नणंद मोनिका दादाभाऊ वाघ धावली असता विक्रम पडवळने तिच्यावरही चाकूने वार करून जखमी केले. घटनेनंतर वाघ यांनी रूपाली आणि मोनिका यांना मोटारसायकल वरून एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठवले. प्रवरा रुग्णालयात उपचारा दरम्यान बुधवारी रात्री ११ जूनला साडेबारा वाजण्याच्या सुमारास गंभीर जखमी झालेल्या रूपाली ज्ञानदेव वाघ हिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर मोनिका हिच्यावर अद्याप प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अजित वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरलीधर रामकृष्ण पडवळ, विक्रम मुरलीधर पडवळ आणि अलका विक्रम पडवळ (सर्व रा. कर्जूले पठार, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध बी.एन.एस. आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या व विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून घटनेतील तिनं आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
