रिपाइंसह श्रीरामपूरातील बहुजन समाजाने केली छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची १५१ जयंती साजरी

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची १५१वी जयंती रिपाईच्या वतीने मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम गांधी पुतळा या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांच्या सजवलेल्या प्रतिमेला मा.नगराध्यक्ष अनुराधा अदिक तसेच रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले छत्रपती शाहू महाराज शाहू महाराज हे महान महापुरुष होऊन गेले.

त्यांनी अस्पृश्य बहुजन समाजातील  घटकाला त्यांच्या राजवटीत नेहमीच सन्मानाची व आदराची वागणूक दिली अशा महापुरुषास मी अभिवादन करते असे अदिक आपल्या मनोगतात म्हणाल्या तसेच रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन म्हणाले की सर्व जाती

धर्माच्या मुलांना आपल्या राजवटीमध्ये वस्तीगृहाची सोय करून शिक्षणाचे महत्व ओळखून सर्वांना सक्तीचे शिक्षण केले महाराजांनी शाळेत न जाणाऱ्यांना एक रुपया दंड ठेवला होता.त्याचबरोबर स्त्रियांसाठी पुनर्विवाह तसेच  करून स्त्रियांसाठी हक्काचा कायदा करणारे बहुजन 

समाजाच्या उन्नतीसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद करणारे राजे तसेच अस्पृश्य समाजाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले म्हणून हत्तीवरून साखर वाटणारे महान राजे म्हणजे छत्रपती शाहू महाराज त्यांच्या विचाराची आज खऱ्या अर्थाने नितांत गरज आहे.

 समाजातील प्रत्येक घटकाने त्यांच्या विचारावर चालल्यास समाजातील प्रगती निश्चित होईल असे अंतिमतःश्री त्रिभुवन म्हणाले  यावेळी मुळा प्रवराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजीत लिप्टे मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये 

राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड  पी.एस. निकम आदींनी मनोगत व्यक्त केले त्यावेळी डॉ. सलीम शेख साजिद मिर्झा नीरज भोसले प्रकाश ढोकणे शिवसेनेचे प्रदीप वाघ विशाल शिरसाठ डॉ. बाळासाहेब मोरे सुभाष गायकवाड मनोज काळे योगेश बनसोडे 

अझर शेख संदीप पवार संघराज त्रिभुवन अविनाश पोळेकर गोरख आढाव रोशन बात्रा दीपक माखीजा राजेश बत्रा, अहमद शहा शाहरुख मन्सुरी महेश होणे चंद्रकांत देवधर बापूसाहेब भालेराव अशोक बागुल रवी अण्णा गायकवाड कारभारी त्रिभुवन यश मालकर 

भगवान कुंकूलोळ मच्छिंद्र साळुंके अनंत धुमाळ विकास राजपूत नितीन कापुरे ज्ञानेश्वर पवार अशोक अभंग सागर कांबळे संदीप विधाते मुकेश बागवानी रवींद्र भालेराव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन तेजस गायकवाड यांनी केले तर आभार गौतम उपाध्ये यांनी मानले
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!