उंबरी बाळापूर येथील शेतकऱ्यांवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला

Cityline Media
0
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या तात्काळ पिंजरे लावण्याच्या सूचना

आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील उंबरीबाळापुर येथील शेतकरी मच्छिंद्र दगडू कालेकर (वय ५६) यांच्यावर मंगळवारी (दि. १७ जून) सकाळी ९ वाजेच्या सुमारास जनावरांनसाठी गिनी गवत तोडत असतांना बिबट्याने प्राणघातक हल्ला केला त्यात ते गंभीर जखमी झाले.
                   छाया-वैभव ताजणे
घटनेची माहिती समजताच तात्काळ जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांना दिली त्यांनी तात्काळ पिंजरे लावण्याच्या सूचना वनविभागाला दिली असल्याची माहिती पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजयराव म्हसे यांनी दिली

     या घटनेबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर शिवारातील कारवाडी येथील मच्छिंद्र दगडू कालेकर हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास शेतात जनावरांसाठी गिनी गवत आणण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या समवेत पत्नी आणि मुलगा जीवन कालेकर देखील होते. त्यांची पत्नी व मुलगा शेतातील इतर काम करत होते. तर, ते स्वतः खाली वाकून गिनी गवत तोडत होते. त्यावेळी शिकारीच्या शोधात दबा धरून बसलेल्या बिबट्याने खाली वाकलेले मच्छिंद्र कालेकर हे सावज वाटल्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.जवळचं असलेल्या पत्नी व मुलाने प्रसंग सावधान राखत जोरदार आरडाओरडा करत तिकडे धाव घेतल्यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली. 
बिबट्याच्या हल्यात एखाद्याचा मृत्यू झाला तरच वनविभागाला जाग येईल का?
गेल्या काही दिवसापासुन उंबरीबाळापुर येथे प्राण्यावर बिबट्याचे हल्ले होत होते पण आज सकाळीच बिबट्याने माणसांवर हल्ला केल्यामुळे परिसरामध्ये भिंतीचे वातावरण आहे. वनविभागाने मोठ्या प्रमाणात पिंजरे लावुन बिबट्या जेलबंद करावा.
जीवन कालेकर,शेतकरी,उंबरीबाळापुर

परिसरात पिंजरे लावले आहेत नागरिकांनी घाबरू नये
घटना स्थळाच्या ५ कि.मीच्या आत मध्ये ३ पिंजरे लावण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी तसेच नागरीकांनी घाबरून जाऊ नये.वनविभागत बिबट्या पकडण्यासाठी शेतकऱ्यांना पुर्ण सहकार्य करणार आहे.
रमेश पवार,वन परिमंडल अधिकारी,शाखा २ संगमनेर

घटनेची माहिती मिळताच सुभाष होडगर,विनायक जऱ्हाड,संजय गायकवाड, संदीप होडगर, किरण कालेकर,प्रशांत उंबरकर आदीनी तात्काळ जखमी कालेकर यांना निमगावजाळी तसेच नंतर घुलेवाडी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!