कर्मवीर भाऊराव पाटील यांचे व्यक्तिमत्त्व जातीभेदाच्या पलीकडे प्राचार्य-वडितके
आश्वी संजय गायकवाड कर्मवीर भाऊराव पाटील यांचे व्यक्तिमत्त्व जातीभेदाच्या पलीकडे होते.महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता याचे संस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन आश्वी इंग्लिश स्कुल व महाविद्यालयाचे प्राचार्य देवराम वडितके यांनी केले.
आश्वी इंग्लिश स्कुल व महाविद्यालया मध्ये इयत्ता ५ ते १२ पर्य़त नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीच्या स्वागत प्रंसगी मार्गदर्शन करताना प्राचार्य देवराम वडितके बोलत होते यावेळी विखे कारखान्याचे संचालक विजयराव म्हसे, मा. सरपंच बाळकृष्ण होडगर ,ज्येष्ठ पत्रकार सिताराम चांडे,भाऊराव कांगुणे,सुभाषराव म्हसे,बाळासाहेब गायकवाड,सुमतीलाल गांधी,ब्रिजमोहन बिहाणी,किशोर जऱ्हाड प्रार्चाय देवराम वडितके यासह विद्यार्थी पालक,शिक्षक उपस्थित होते. आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना प्राचार्य वडितके म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर पाटलांनी चालवलेल्या वसतिगृहात विविध जाती-धर्माचे विद्यार्थी एकत्र राहत असत, ते सर्वजण स्वतःच्या हाताने सामुदायिकरित्या स्वयंपाक करत आणि एकत्रच जेवण करत असे.आज विद्यालयात विशेषतः इयत्ता ५ वीच्या विद्यार्थीचे स्वागत पारंपारिक लेझीम व टाळ वाजवत स्वागत करण्यात आले यासाठी सर्व सहकारी शिक्षक प्रयत्नशील होते.
राज्यभरात शासकीय नियमानुसार तसेच रयत शिक्षण संस्थेच्या आदेशानुसार प्राथमिक तसेच महाविद्यालय १६ जुन पासुन शाळाची घंटा वाजली असुन त्याच अनुषंगाने रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी इंग्लिश स्कुल व महाविद्यालयात इयत्ता ५ वी मध्ये नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थीचे स्वागत पारंपारिक लेझीम व टाळ वाजवत स्वागत करण्यात आले, तसेच प्रत्येक विद्यार्थीना गुलाब पुष्प,पेन व शालेय़ साहित्य वाटप करण्यात आले..यावेळी शिक्षकांनी मुलांच्या अंगावर पुष्पवृष्टी केली.प्रत्येक नवीन विद्यार्थ्यांच्या कपाळावर प्राचार्य देवराम वडितके,पर्यवेक्षक दिपक चव्हाण,रमेश थेटे, संजय बनकर, सविता पोखरकर, सुवर्णा वाकचौरे ज्योती किरवे, राजेंद्र बर्डे,अनिता गाडे वैशाली सोसे आदी शिक्षकांनी टिळा लावत स्वागत केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सरपंच बाळकृष्ण होडगर होते तर कार्य़क्रमांचे सुत्रसंचालन अनिता गाडे यांनी केले.
नवी शाळा चैतन्य देणारी
-जुनी जिल्हा परिषद शाळा सोडुन नवीन शाळेत प्रवेश घेतल्यानंतर नवीन मैत्रिणी मिळाल्या तसेच प्रत्येक विषयास वेगळे शिक्षक असणार आहे.यामुळे शिक्षकांकडुन नव नवीन विषया बद्दल माहिती मिळणार असल्याने आनंद होत आहे.
कु.आऱाध्या वैभव ताजणे, इयत्ता ५ वी
