पदवीबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्ता किमान कौशल्य आवश्यक-दिपक शिकारपूर

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड ज्ञानाची आास विद्यार्थ्यांना असते.ते रोज नवीन काही तरी शिकत असतात. विद्याध्यांनी केवळ पदवी घेऊन उपयोग नाही त्याला किमान कौशल्याचीही जोड हवी. सोबत कार्यानुभव असल्यास त्यांचा अधिकाधिक फायदा होतो अशी आपली म्हणजे भारताची प्रतिभा आहे. आरोग्य क्षेत्रात एआयचा चांगला उपयोग होऊ शकतो या माध्यमातून अधिकाधिक चांगली समाजसेवा आपण देऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक डॉ. दीपक शिकारपूर यांनी केले.
एकलव्य मंडल,रागी इव्हेंट्स आणि नेट कॉम्प्युटर्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि तंत्र क्षेत्रात भारतीय प्रतिमेसाठी जागतिक संधी' या विषयावर ते बोलत होते.

डॉ. कुर्तकोटी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओमप्रकाश कुलकर्णी होते. प्राचार्य शिरिष साने हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, की विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान असणेही महत्वाचे असून, किराणा मालाच्या दुकानात अधिक चांगलें व्यवहार ज्ञान मिळत असल्याचे त्यांनी एक दाखला देत सांगितले.

बदलत्या काळानुसार विद्यार्थांनी तैवान आणि कोरिया या तीन देशांकडे अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. यासाठी तेथील स्थानिक भाषा शिकणे गरजेचे आहे. आज विद्यार्थ्यांना अनेक संधी आहेत.जापानी नागरिकांचे वय सरासरी ८३ वर्षे असल्याचे त्यांनी सांगितले. आहे यामुळे विद्यार्थ्यांनी जपानला जाण्याचा अधिक विचार करावा,तेथे रोजगाराच्या खूप संधी उपलब्ध असून,या संधीचे सोने करण्याची संधी आपल्याला मिळू, शकते, असेही त्यांनी सांगितले. जपान बरोबरच काही नकारात्मक बाबींचाही आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो हेही शिकारपूर यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना डॉ. शिरीष साने म्हणाले, की एआय बाबत आपल्याकडे अनेक समज गैरसमज आहेत. दूर होणे आवश्यक आहे. एआय मुळे नोकऱ्यांच्या संधी काही प्रमाणात कमी झाल्या, तरी इतर अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

अध्यक्षीय भाषणात ओमप्रकाश कुलकर्णी म्हणाले, की आपल्या अनुभवांचे अधिकाधिक डिजिटलायझेशन होणे गरजेचे आहे.आपले अनुभव डिजिटल झाले, तर एआय सुद्धा समृद्ध होईल. त्याचा आपल्याजा निश्चितच फायदा होईल. प्रारंभी एकलव्य मंडळाचे अध्यक्ष प्रकाश दीक्षित यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचा सरकार केला. नेट कॉम्प्युटर एज्युकेशनचे प्रसाद जावळे यांनी डॉ. दीपक शिकारपूर यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लवाटे यांनी केले आभार प्रदर्शन अभिषेक दिक्षित यांनी मानले.कार्यक्रमात शहरातील नागरिकांसह आयटी क्षेत्रातील तंत्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!