नाशिक दिनकर गायकवाड येथील मविप्र कर्मवीर रावसाहेब धोरात सभागृह व आयएमआरटी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये नुकतेच पहिली वाहिली मराठी भाषा-संस्कृती परिषद होणार आहे,अशी माहिती मविप्रच्या मध्यवर्ती कार्यालयात नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
मराठी भाषेला 'अभिजात भाषेचा साज मिळाला खरा, परंतु, राजभाषा, लोकभाषा ज्ञानभाषा व्यवहारभाषा अलंकार प्राप्त होणे आवश्यक आहे. सजग, स्वाभिमानी समाजनिर्मितीसाठी, संस्कृती रक्षण आणि अस्मिता संगोपनासाठी आपल्या मराठी मातृभाषेच्या पदराचे कवच आवश्यक आहे.
परभाषा, परसंस्कृती या पुतणा मावशीच्या जोखडातून सुटका करवून, शूर व स्व अस्तित्वाने झळाळणारी पिढी निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी आणि एकूणच मराठी भाषेचा विविधांगी अभ्यास व्हावा, यावर सखोल विचारमंथन व्हावे, म्हणून नाशिकमध्ये कुसुमाग्रज मराठी विचार मंचच्या पुढाकाराने प्रथमच 'अखिल भारतीय मराठी भाषा-संस्कृती परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. मराठा विद्याप्रसारक समाज संस्था या परिषदेसाठी सहकार्य व आवश्यक ती मदत करणार आहे, अशी माहिती मविप्रचे सरचिटणीस अँड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंचाचे अध्यक्ष सतीश बोरा, उपाध्यक्ष दिलीप बारवकर, सरचिटणीस सुभाष सबनीस आनंद देशपांडे, खजिनदार जयप्रकाश मुथा, शिरीष देशपांडे, विश्वरत नंदविलोर ठोंबरे याप्रसंगी उपस्थित होते.या दोनदिवसीय परिषदेमध्ये विद्वत विचारवंत, समाजहितैषी, मराठी भाषा अभ्यासक, तत्त्ववेते यांच्या वैचारिक आदान प्रदानाने मराठी भाषाविषयक समाज जागृतीचे नवनीत काइदाका प्रयत्न होणार आहे. या परिषदेसाठी तमाम मराठी भाषाप्रेमींचे सहकार्य सर्वाधनि व्हावे, अशी अपेक्षा सतीश बोरा, सुभाष सबनीस, तसेच ॲड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केली.
या परिषदेमध्ये मराठीच्या अवनतीची कारणे, मराठी आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, रोजगार, विकास जास्तीच्या संधीची भाषा कधी होणार?, मराठीच्या उन्नतीसाठी शासनाची भूमिका, मराठी माध्यमातून शिक्षण आवश्यक का आहे?, विभागीय साहित्य संस्था आणि मराठी भाषा, मराठीच्या उपाय योजनाच्या क्षेत्रांची सद्स्थिती, बृह न्महाराष्ट्रातील मराठी समाज आणि वास्तव, विदेशातील मराठी, मराठी आणि इतर भाषांचा समन्वय आणि अनुवाद, पदवी आणि पदच्युतर शिक्षणात मराठी विषय कर नाही? आपल्या सर्वाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा, मराठी सक्तीचा कायदा आणि त्याच्या अंमलबजावणीची वस्तुस्थिती, माध्यमांमधील मराठी, मराठी भाषिकांची मराठी बाबतची उदासीनता, मराठीसाठी काय करावे? भाषा विज्ञान हा विषय उपेक्षित का आहे? साहित्य केंद्री भाषा शिक्षणाची गरज, संस्कृतीची बदलती संकल्पना, भाषा आणि संस्कृती संबंध, संस्कृती आणि लोकसंस्कृती, मराठी भाषा आणि
बृहन्महाराष्ट्रातील संस्कृती, धर्म आणि संस्कृती परस्परसंबंध, या आणि अशा अनेक विषयांवर चर्चा सत्र गटया, परिसंवाद, व्याख्याने, तसेच मराठी संस्कृती विषयक विविध कार्यक्रम, कवी संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.
या भाषेच्या घुसळणातून निघणारे तथ्य ग्रंथरूपाने प्रसिद्ध करून एक महत्त्वाचा दस्तऐवज या आणि यापुढील पिढीतील मराठी भाषा अभ्यासकांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न कुसुमाग्रज मराठी विचार मंच संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
मराठी भाषाविषयक ठोस कार्यक्रम म्हणून हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून, ही परिषद याच उपक्रमाचा मुख्य टप्पा आहे. असे विविध उपक्रम नियमितपणे करण्याचा प्रयत्न सुरूच राहणार आहेत. लवकरच परिषदेचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष तसेच उद्घाटन आणि समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ठरविण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती वेळोवेळी प्रसारमाध्यमांना उपलब्ध करून देण्यात येईल, असे सतीश बोरा आणि सुभाष सबनीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. मराठी भाषाप्रेमींचे कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे.
