जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याशी नॅशनल दलित मुव्हमेंटचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते चर्चा झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी सोलापूर यांनी सर्व प्राचार्य/अधिष्ठाता कनिष्ठ/वरीष्ठ/व्यवसायिक/तांत्रिक/बिगर व्यवसायिक महाविद्यालये
यांना अनुसूचित जातीच्या कोणत्याही विद्यार्थ्याकडून कसल्याही प्रकारची फी वसूल करू नये.आणि फी मागितल्याची तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांनी सर्व महाविद्यालयांना दिलेला आहे.
आम्ही नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस एन.डी.एम.जे संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या विमुक्त व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शाळा महाविद्यालय भरमसाठ ही आकारात आहेत अशी तक्रार जिल्हाधिकारी व संबंधित कार्यालय प्रमुखांकडे केले आहे याची दखल घेऊन जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांनी आदेश काढलेले आहेत त्यामुळे आम्ही सोलापूर जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या आभारी आहोत.
असा आदेश संपूर्ण महाराष्ट्रासाठी काढावा यासाठी मंत्रालय स्तरावरचा पाठपुरावा सुरू असून लवकरच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा आदेश लागू होईल.
महाराष्ट्रातील नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आपल्या सभोवतालच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांनी ही वसूल करू नये. तसेच सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार प्रवेश मिळतील कोणत्याही विद्यार्थ्यांचे गैरसोय होणार नाही यासाठी एन.डी.एम.जे संघटनेच्या नेत्यांनी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करावयाची आहे.
वैभव तानाजी गिते
राज्य सचिव
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस
8484849480
