श्रीरामपूर दिपक कदम श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे भारतीय जनता पार्टी यांच्याकडून जुना नाका संगमनेर रोड या ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर तसेच शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, यांनी पालखीचे विधिवत पूजन करून दर्शन घेतले तसेच पंढरीचा पांडुरंग यांचा नामाचा जय घोष करण्यात आला भाजपा पदाधिकारी यांनी दर्शन घेऊन पायी दिंडीतील भाविकांसाठी पाणी मिठाई तसेच खाद्यपदार्थाचे वाटप केले.
यावेळी माजी शहराध्यक्ष मारुती बिंगले, मा.नगराध्यक्ष संजय फंड सांस्कृतिक सेल जिल्हाअध्यक्ष बंडूकुमार शिंदे, रुपेश हरकल, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, डॉ. मनोज छाजेड, आशिष धनवटे,संजय गांगड, विजय आखाडे,अक्षय गाडेकर, महेश सूळ,आनंद बुधेकर,अनिकेत भुसे,श्रेयस झिरगे, किरण कर्नावट,
सोमनाथ गांगड, प्रतीक वैदय, तेजस उंडे, योगेश ओझा, सुबोध शेवतेकर, इंजी संदिप चव्हाण ,विजयराव शेलार, कुणाल करंडे, मिलिंदकुमार साळवे, सुनील कपिले, राजेंद्र आदिक,तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी भाविक भक्त उपस्थित होते.
ठिकठिकाणी पायी दिडींतील भाविकांचे स्वागत करण्यात आले विठु रायाच्या नामघोषाने परिसर दुमदुमुन गेला होता या कार्यक्रमासाठी भाजपा सर्व पदाधिकारी प्रयत्नशील होते.
