आंदोलनानंतर श्रीरामपूर येथील महसूल अधिकाऱ्यांना होमिओपॅथी डॉक्टरांनी दिले निवेदन
श्रीरामपूर दिपक कदम होमिओपॅथी मधील ज्या डॉक्टरांनी महाराष्ट्र शासनाने तयार केलेला सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी हा कोर्स पूर्ण केला आहे, त्यांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेत नोंदणी करण्याचा अधिकार मिळावा याकरिता दोन्ही सभागृहात घेतलेल्या निर्णयाची अमलबजावणी होण्यास सुरुवात होणार असतांना. राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना नोंदणीकृत करण्याच्या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) विरोध दर्शविला आहे.
या विरोधाच्या भूमिकेमुळे होमिओपॅथी डॉक्टरांवर अन्याय होत असल्याचा आरोप असोसिएशनने केला असून.आयएमए च्या भूमिकेमुळे शासनाने घेतलेला निर्णय रखडला आहे.या पार्श्वभूमीवर, होमिओपॅथी डॉक्टरांना अधिक वेठीस न धरता शासनाने आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, मागणीसाठी श्रीरामपूर होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनच्या वतीने तहसीलदार कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.
यावेळी होमिओपॅथी डॉक्टरांच्या मागण्यांचे निवेदन महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आले.यावेळी डॉ ललित सावज, डॉ वैभव निकम, डॉ नवनीत जोशी , डॉ मच्छिंद्र त्रिभुवन,डॉ सुदर्शन रानवडे, डॉ आशिष जयस्वाल,डॉ मोहन कडणोर, डॉ राहुल पडवळकर, डॉ शफी शेख, डॉ विनायक सलालकर,
डॉ भूषण लाहोरे,डॉ मच्छिंद्र निर्मळ,डॉ संदीप पठारे, डॉ संजय अबक,डॉ विशाल भालेराव,डॉ कुणाल कोळसे,डॉ भरत गिडवाणी,डॉ दिपाली जयस्वाल,डॉ अश्विनी त्रिभुवन, डॉ माधुरी रानवडे,डॉ भारत काळे, डॉ विक्रांत खरात, अतुल शिंदे,डॉ सुहास दौले, डॉ प्रवीण देसाई,डॉ उज्ज्वल धुमाळ,डॉ गणेश कुंदे, डॉ मुजाहिद सैय्यद, डॉ नानासाहेब भोसले, डॉ आदेश वकचौरे, डॉ महेंद्र मिरीकर,डॉ नितीन मगर, डॉ शीतल महाले, डॉ पूनम शिंदे, डॉ रवींद्र पवार, डॉ अरबाज पठाण, डॉ अविनाश गायकवाड, डॉ अभिजीत चव्हाण, डॉ आरिफ शेख, डॉ सलीम शेख, डॉ अदनान मुसानी, डॉ महेश शरणागत, डॉ सरफराज मेमन, डॉ बाबासाहेब पिसाळ आदीं डॉक्टरांच्या सह्या असलेले निवेदन श्रीरामपूर तालुका होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशच्या वतीने प्रशासनास देण्यात आले..