संगमनेर प्नतिनिधी भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने संगमनेर शहराची कार्यकारणीचे पुनर्गठन, नुकतेच शहरातील सिद्धार्थ विद्यालय संगमनेर येथे पार पडले.
प्रसंगी जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर बिपिन गायकवाड नरेंद्र पवार व रावसाहेब पराड यांनी मार्गदर्शन केले यावेळी संगमनेर शहर कार्यकारणीचे पुनर्गठन करण्यात आले आणि नुतन नियुक्ती करण्यात आली भारतीय बौद्ध महासभा संगमनेर शहराध्यक्ष पदी विनय घोसाळे महासचिव पदी सचिन साळवे कोषाध्यक्ष दिलीप भोरूंडे यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी संस्कार समिती.बाबासाहेब मोकळ .प्रचार व पर्यटन समिती तेजस घोसाळे.संरक्षण समिती- जयराज दुशिंग. हिशोब तपासणी- अमोल कदम कार्यालयीन सचिव - अश्विनी कुमार बोर्डे .सचिव पदी संस्कार विभाग . रवी दिवे, .ऋषिकेश घोलप .प्रचार पर्यटन .दिलीप पराड संरक्षक पदी- निलेश कुसरे चंद्रकांत जाधव. संघटक पदी राजेंद्र भालेराव ,दिपक तपासे,.चंद्रकांत खरात,.विनोद गायकवाड,.संतोष गायकवाड,.अमोल गायकवाड. अंकुश माघाडे यांची नियुक्ती करण्यात आली . मार्गदर्शक म्हणून. रघुनाथ भालेराव यांची नेमणूक करण्यात आली. निवडीची उद्घघोषणा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष .शांताराम रणशूर यांनी केले व कामकाज मार्गदर्शन.नरेंद्र पवार व.बिपिन गायकवाड यांनी केले.
या कार्यक्रमासाठी तालुका कार्यकारणीतील तालुका महासचिव राजेंद्र मुन्तोडे मा.जिल्हाध्यक्ष व वाय.एल. मुन्तोडे मा.तालुका अध्यक्ष साहेबराव टपाल हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन संगमनेर तालुका बौद्ध महासभा अध्यक्ष.अशोक गायकवाड यांनी केले.याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा शहर कमिटीचे .विनय घोसाळे.सचिन साळवे दिलीप भोरुंडे यांनी बौद्ध बांधवांना व उपासकांना बौद्ध विचाराचा प्रचार करण्याचे आवाहन केले.