महाराष्ट्रातील बारा शिवकालीन किल्ले युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट

Cityline Media
0
महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि  गौरवाचा क्षण

मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र ह्या नावाची ओळख ज्यांच्या नावापासून झाली ते कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांच्या सोबतीने स्थापन केलेल्या स्वराज्य स्थापनेच्या संग्रामाचे साक्षीदार आणि मराठ्यांच्या धैर्य, शौर्य, त्याग,पराक्रमाचा वारसा लाभलेले राज्यातील रायगड, राजगड, प्रतापगड, लोहगड, शिवनेरी, पन्हाळा, साल्हेर, खांदेरी, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग तसंच तामिळनाडूतील जिंजी या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत झाला, ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
राज्याला हे यश मिळवून देण्यात प्रधानमंत्री. नरेंद्र मोदी आणि केंद्रसरकाची भूमिका, त्यांचं सहकार्य महत्वाचं ठरलं.महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान, स्वाभिमान बाळगणाऱ्या तमाम महाराष्ट्रवासियांचं देखील मी अभिनंदन करतो आणि या ऐतिहासिक क्षणाच्या सर्वांना शुभेच्छा देतो.असे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील अठरापगड जाती, बारा बलुतेदार मावळ्यांना संघटीत करुन महाराष्ट्राच्या मातीत रयतेचं राज्य, शेतकऱ्यांचं स्वराज्य निर्माण केलं.रयतेचं राज्य स्थापन करण्याचा ध्यास घेऊन लढलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना याच किल्ल्यांनी भक्कम साथ दिली होती.महाराजांच्या, त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास पाहिलेल्या या ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झाल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, त्यांचे विचार, मराठी मावळ्यांचा पराक्रम जगभरात पोहोचेल.छत्रपती शिवाजी महाराज जगाला समजतील.ऐतिहासिक वारशाचा गौरव लाभलेल्या या बारा किल्ल्यांसह राज्यातील सर्वच किल्यांचं संरक्षण, संवर्धन करण्यासह त्यांचं महत्व, तिथे घडलेला इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा दृढसंकल्प होऊया, असे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी केले. युनेस्कोच्या यादीत महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न केलेल्या राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे मी विशेष अभिनंदन करतो.          युनेस्कोचे पथक पाहणी करताना 
शिवरायांचे गडकिल्ले म्हणजे केवळ दगड धोंड्यांचं बांधकाम नाही,तर ते महाराष्ट्राच्या अस्मितेचे भक्कम बुरुज आहेत.आज त्यांना जागतिक दर्जा मिळाल्यानं स्वराज्याच्या इतिहासाला नवसंजीवनी मिळाली आहे. राज्यातील दुर्ग दुर्गेश्वर रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि खांदेरी हे ११ किल्ले शिवकालीन सामरिक रणनीती, अद्वितीय स्थापत्य कौशल्य आणि सांस्कृतिक परंपरेचं प्रतीक आहेत. या यशासाठी महाराष्ट्र शासनानं अतिशय अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय पद्धतीनं प्रस्ताव तयार केला होता. प्रधानमंत्री कार्यालयानं “मराठा लष्करी स्थापत्य” प्रस्तावाची निवड करून युनेस्कोकडे पाठवली. या यशात राज्य सरकारच्या प्रयत्नांबरोबरच केंद्र सरकारच्या नेतृत्वात झालेल्या प्रयत्नांना मोलाचं यश मिळालं आहे.

युनेस्कोकडून मिळालेली ही मान्यता म्हणजे केवळ महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाला अधोरेखित करणारा सन्मान नाही,तर ती पर्यटन, स्थानिक रोजगार, संशोधन आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. महाराष्ट्रातील गडकोटांभोवती स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणारी नवीन अर्थव्यवस्था निर्माण होण्याची दिशा या निर्णयामुळे निश्चित झाली आहे.

शिवकालीन गडकोटांना युनेस्कोकडून मिळालेली मान्यता ही आपल्या संस्कृतीचा, स्वराज्य संकल्पनेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा जागतिक स्वीकार आहे. हे महाराष्ट्रासाठी एक तेजस्वी पर्व आहे. महाराष्ट्राच्या मातीतून घडलेली ही दुर्गशक्ती आता जागतिक मंचावर मानानं झळकणार, याचा आनंद आहे असे उपमुख्यमंत्री अजित यांनी यावेळी स्पष्ट केले.   युनेस्को पथक महाराष्ट्रातील गड किल्ल्यावर दाखल

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!