-दाढ खुर्द मध्ये पुरुष सर्वसाधारण सरपंच पदासाठी आरक्षण निघाल्याने आजी माजी सरपंचामध्ये रस्सीखेच होणार
-विजय खेचून आणणारे नवे उमेदवार रिंगणात उतरण्याच्या तयारीत
दाढ खुर्द प्नतिनिधी संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील, शिर्डी विधानसभा मतदार संघातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या दाढ खुर्द येथे नुकत्याच जाहीर झालेल्या सरपंच पदाच्या आरक्षणामध्ये सर्वसाधारण पुरुष आरक्षण निघाल्याने आजी-माजी सरपंचामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून लागोलाग गावांमध्ये मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे.
दाढ खुर्द गावामध्ये सर्वसाधारण आरक्षण असल्याने गावांमध्ये पुढाऱ्यांची संख्या प्रबळ आहे.वास्तविक गावाची लोकसंख्या कमी असली तरी गावांमध्ये पुढाऱ्याची संख्या जास्त असल्याने सर्वच पुढाऱ्यांना गावचा कारभारी होण्याचे स्वप्न पडू लागले आहेत यामध्ये प्रामुख्याने दाढ खुर्द ग्रामपंचायत मध्ये विखे गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे.
गेल्या दोन पंचवार्षिक पासून थोरात गटाच्या दोन जागा प्रामुख्याने निवडून आलेल्या असून गेली दहा वर्षापासून थोरात गटाचे संख्याबळ कमी असल्याने विखे गटाचा अंतर्गत मतभेद उफाळ्यामुळे त्याचा फायदा घेत थोरात गटाने गेली दहा वर्षे आपल्या दोन जागा असूनही उपसरपंच पद भूषविले आहे.
त्यातच अंतर्गत येथे विखे गटाचे दोन प्रमुख गट असून त्यामध्ये दोघांची चांगलीच रस्सीखेच असते यामध्ये प्रामुख्याने मागील पंचवार्षिक मध्ये सरपंच राहिलेले सौ.सुमन बाळासाहेब जोशी यांचे चिरंजीव मा.खासदार सुजय दादा विखे पा. यांचे कट्टर समर्थक सुनील बाळासाहेब जोशी
व आता विद्यमान असलेले सरपंच सतीश कुंडलिक जोशी हे दोघेही प्रामुख्याने आपली तयारी सुरू केली असून व्हाट्सअपच्या माध्यमातून गावामध्ये भेटीगाठी काट्यावरती गप्पा गावातील इतर कार्यकर्त्यांना चहापाणी सुरू केला असून हे दोघेही प्रमुख सरपंच
पदाचे दावेदार म्हणून चर्चेत आहे तर मागील दहा वर्षांमध्ये सरपंच पदावर कार्यरत असलेले संजय रघुनाथ जोशी अशोक भागवत जोशी हे दोघेही माजी सरपंच असून हे सुद्धा सरपंच पदासाठी प्रमुख दावेदार समजले जातात व हे दोघेही तुल्य व उमेदवार असून दोघेही
सोसायटीचे माजी अध्यक्ष व पदाधिकारी आहेत त्यामुळे या चौघांमध्ये जंगी सामना होणार असल्याचे मतदार नागरिक वर्गामध्ये चर्चा आहे तर विरोधी थोरात गटांमध्ये युवक काँग्रेसचे गटनेते किशोर अशोक जोशी व जय हिंद युवा मंचचे गणेश भाऊसाहेब जोरी हेही विरोधी गटाचे
तुल्यबळ सरपंच पदाचे उमेदवार म्हणून नागरिक वर्गामध्ये चर्चेत आहे तर येथे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे हेही तुल्यबळ उमेदवार असल्याने त्यांचाही गावांमध्ये चांगला दांडगा जनसंपर्क असून तेही सरपंच पदाचे उमेदवार असून शिंदे गट व
महायुतीचे भाजपचे अधिकृत युती असून युतीच्या माध्यमातून ते विखे गटाकडून इच्छुक उमेदवार व सरपंच पदाचा नवीन चेहरा व सर्व राजकीय कामकाजाचा व विकास कामाचा अनुभवी उमेदवार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असून नामदार राधाकृष्ण विखे पा.पालकमंत्री अहिल्यानगर यांचे व मा. खासदार डॉक्टर सुजय विखे पा.
संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळे यांचे विश्वासू सहकारी असल्याने ते गावच्या राजकारणामध्ये गेली २०-२५ वर्षापासून सक्रिय असून ते सुद्धा सरपंच पदाचे प्रमुख दावेदार आहे तर गावातील इतर प्रमुख संघटना मधील प्रामुख्याने लहुजी सेनेचे
डॉ.राजेंद्र साळवे,दगडू रघुनाथ साळवे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हरिभाऊ जोरी तर माळी महासंघाचे दत्तात्रय पर्वत नितीन पाबळे आदी प्रमुख तुल्यबळ उमेदवार असल्याने दाढ खुर्द येथे सरपंच पदासाठी चांगला सामना रंगणार असून यामध्ये प्रामुख्याने
सत्ताधारी विखे गट आपली बाजी नक्कीच मारणार यात मात्र तिळ मात्र शंका नाही असे चित्र निर्माण होताना दिसते परंतु विरोधी थोरात गट हा सत्तेत नसल्याने त्यांना सहानुभूती मिळते की याची खरं सत्वपरीक्षा येथील थोरात गटाचे कार्यकर्ते बघणार असून नागरिक वर्गामध्ये व मतदारांमध्ये विद्यमान सरपंच व तत्कालीन सरपंच हे दोघे सरपंच यांच्या काळामध्ये विकास कामे समाधानकारक झाले आहे .
गावातील विकासकामे हेच समाधानकारक उत्तर असले पाहिजे असा येथील मतदार वर्गाचा होरा आहे गावाला जोडणारे प्रमुख रस्ते हे खड्डेमय झाल्याने व पाणी प्रश्न वाडी वस्तीवर प्रलंबित असल्याने मतदार वर्गामध्ये मात्र दोघांवरही मोठे प्रमाणात प्रचंड नाराजी असून येथील
मतदाराला नवीन चेहरा व ठेकेदारी नसणारा व भ्रष्टाचार मुक्त स्थानिक राजकारणामध्ये पकड असणारा व गावच्या सर्वांगीण विकासाचा अनुभव असणारा उच्चशिक्षित उमेदवार येथील मतदारांना व नागरिकांना सरपंच म्हणून अपेक्षित आहे तर या पंचवार्षिक मध्ये
मतदार वर्गामध्ये गावाला पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने नागरिकांचे सत्ताधारी गटाच्या सरपंचावर मोठ्या प्रमाणावर नाराज असून विद्यमान सरपंच नामदार राधाकृष्ण विखे पा.व डॉ. सुजय विखे पा.यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असूनही साधा गावाला पूर्ण वेळ ग्रामसेवक आणू शकले नसल्याने विद्यमान सरपंचावर नागरिकांची मोठी नाराजी आहे.
तर नागरिक वर्गामध्ये विद्यमान सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी उत्कृष्ट ग्रामपंचायत कारभार चालवत असल्याचे बोलले जातेय परंतु पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने जन्म मृत्यू नोंदणी दाखले आदी महत्त्वाचे वेळेवर भेटत नसल्याने प्रचंड नाराजी असून गावचा एक सूत्री कारभार हाकणारा कारभारी मतदारांना अपेक्षित असुन पूर्णवेळ ग्राम सेवक गावाला अपेक्षित आहे.
दाढ खुर्द गावामध्ये प्रामुख्याने धनगर समाजाचे मतदान प्रथम क्रमांकाचे असल्याने या समाजाचे प्राबल्य गावावर व पदावर असून दुसऱ्या दोन मध्ये माळी समाज व इतर समाज चार पाच सहा क्रमांकाचे असून खऱ्या अर्थाने धनगर समाज व माळी समाज या दोन्ही समाजावर सरपंच पदाचा उमेदवार व निवडणूक अवलंबून असून या दोन समाजामध्ये ज्याची बाजू भक्कम आहे तो उमेदवार नक्कीच निवडून येणार अशी चर्चा येथील नागरिक वर्गामध्ये सुरू असून दाढ खुर्द गावचा कारभारी नक्की कोण? होणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
