श्रीरामपूर दिपक कदम राज्याचे जलसंपदा मंत्री,अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा. यांच्या हस्ते श्रीरामपूर येथील प्रभागातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.
मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे ,मा.नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांनी प्रभागातील मुख्य समस्या असलेल्या उत्सव मंगल कार्यालय ते महाले पोदार स्कूल नाला(चर) सिमेंट काँक्रेटीकरण करत भूमिगत करणे,भोंगळ वस्ती पाईपलाईन जोडणे, पूर्णवादनगर टीपी रिझर्व्हेशन काढणे, प्रभागाला वाढीव निधी देणे या मागण्या नागरिकांसह नामदार विखे यांच्याकडे केल्या.
नामदार विखेंनी तात्काळ प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी,मुख्याधिकारी श्रीरामपूर यांना सूचना करत वरील सर्व कामे मार्गी लावावे तसेच उत्सव मंगल कार्यालय ते महाले पोदार स्कूल नाला(चर) सिमेंट भूमिगत काँक्रेटीकरण करण्याचे प्रस्ताव दाखल असे आदेश दिले.यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.