संगमनेर प्रतिनिधी शहरातील इनर व्हील क्लब ऑफ संगमनेर २०२५-२६ सालच्या अध्यक्ष व कार्यकारी समिती सदस्यांचा भव्य पदग्रहण समारंभ नुकताच येथे उत्साही वातावरणात पार पडला.
या विशेष प्रसंगी नुतन अध्यक्ष व समिती सदस्यांना मन:पूर्वक शुभेच्छा देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रसंगी मा नगराध्यक्ष सौ.दुर्गा तांबे सौ. रचना मालपाणी, डॉ. जयश्री थोरात, रोटरी क्लबच्या नुतन अध्यक्षा सौ. सपना नावंदर, उपाध्यक्ष सौ. शिला करंजेकर,मावळत्या अध्यक्ष नेहा सराफ, तसेच इनर व्हील क्लबच्या सर्व सदस्य भगिनीं उपस्थित होत्या.