नगरपरिषदेवर निदर्शने ‌ श्रीरामपूरकरकरांना उपस्थित राहण्याचे अहवाल-सुभाष त्रिभुवन

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम श्रीरामपूर नगर परिषदेच्या साठवण तलावात शौचालयाचा मैला सोडणाऱ्या समाजकंटाकावर कडक कारवाई करून त्यांच्यावर लाखो रुपयाची दंडात्मक कारवाई करावी तसेच श्रीरामपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व छोट्या-मोठ्या पाई पलाईनची सखोल तपासणी करून शहराला शुद्ध पाणी द्यावे तसेच विविध मागण्यासाठी मंगळवार दिनांक १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता श्रीरामपूर नगर परिषदेवर श्रीरामपूरकरांच्या वतीने भव्य निदर्शlने करण्यात येणार आहे या निदर्शनाला श्रीरामपूरातील नागरिकांनी मोठ्या  संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन यांनी प्रसिद्धी पत्रकाने केले आहे.
 निवेदनात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की देशात कुठेच नसेल एवढे दूषित पाणी श्रीरामपूरची जनता पीत आहे श्रीरामपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप मध्ये शौचालयाचा मैला टाकून काही समाजकंटकांनी श्रीरामपूरकरांना दूषित पाणी पाजले आहे पाजीत आहे एवढा मोठा किळसवाणा संताप जनक माणुसकीला लाजवेल असा प्रकार  घडून देखील श्रीरामपूरची जनता मुगगिळून  बसली आहे म्हणून श्रीरामपूरच्या जनतेला जाग आणण्यासाठी तसेच श्रीरामपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलाव हा राम भरोसे आहे कारण तलावात  पडून दोन मुलांचा मृत्यू झाला होता ते तसेच पाच दिवस  तलावात होते तरीदेखील श्रीरामपूरकरांना काहीच वाटले नाही साठवण तलावात अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता  आहे म्हणून तलावला  वीस फुटाच्या संरक्षण भिंती बांधण्यासाठी साठवण तलावाजवळ सीसी कॅमेरे बसवून तलावाच्या संरक्षणा साठी २४ तास वाचमेनचा पहारा देण्यासाठी तसेच
 पाटाच्या माध्यमातून गोंधवणीच्या साठवण तलावात श्रीरामपूरला पिण्याचे पाणी पोहचविले जाते परंतु  पाटामध्ये  मेलेले कुत्रे जनावर घाण तसेच  पाटाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी त्यांचे
घाण पाण्याचे आउटलेट डायरेक्ट पाटात सोडलेले आहे त्यामुळे श्रीरामपूर शहराला अत्यंत दूषित पाणी मिळते पाटामध्ये दूषित पाणी सोडणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी १ जुलैला श्रीरामपूर  नगरपरिषदेवर भव्य  निदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे असेही शेवटी पत्रकात नमूद करण्यात आले आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी गौतम उपाध्ये संजय छल्लारे राजेंद्र सोनवणे तेजस गायकवाड अभिजीत  लिपटे आदी प्रयत्नशील आहेत‌.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!