येवला प्नतिनिधी तालुक्यातील अनकुटे येथील पुर्व भागातून रेल्वे पट्टरी असल्यामुळे अनकुटे येथील काही भाग नगरसुल सबस्टेशनला जोडला जोडला गेला आहे १९८० साली विद्युत लाईन जोडली गेलेली असुन अद्यापपर्यंत तिची दुरुस्ती केलेली नाही त्यात बरेच पोल तिरपे होऊन दुर्घटना होण्याच्या स्थितीत आहे काही पोलवरील कप फुटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे हि विज येथुन विना अडथळा पुर्ववत व्हावी यासाठी नुकतेच येथील शेतकरी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंता यांना याबाबत तक्रार निवेदन सादर केले आहे.
निवेदनात अधोरेखित केल्याप्रमाणे येथील तारी जुन्या झाल्यामुळे कार्बन आणि घर्षणाने तारी कुमकुवत झाल्यामुळे विद्युत पुरवठा व्यवस्थित होत नाही शेवटचे ठिकाण हे अनकुटे शिवारातील असल्यामुळे इकडे कोणी लक्ष देत नाही शेतकऱ्यांनी अनेक वेळेस जोडारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना सांगीतले तर ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बोट दाखवतात अधिकाऱ्यांशी साधण्याचा प्रयत्न केला असता ते कधीच कार्यालयात उपस्थित नसतात.
ह्या वर्षी वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यानंतर ६ मे पासून एक तास सुध्दा विजसुरळीत टिकत नाही शेतकरी बांधवांना जनावरांना पिण्यासाठी पाणी भरता येत नाही शाळेतील मुलाचा अभ्यास होत नाही विजेची दुरुस्ती करण्यासाठी शेतकरी हातात बाबु घेऊन विजेचे काम करतात त्यात अनेकांना विजेचा धक्का बसलेला आहे.
एखाद्या दिवशी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यातुनच आज संतप्त शेतकऱ्यांनी सावरगाव येथील सबस्टेशन येथे गेले असता तेथील आधिकारी भेटले नाही येवला कार्यालयात गेले असता तेथील कार्यकारी उप अभियंता मिलिंद जाधव यांना लेखी निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदनातील प्रमुख मागण्यापैकी १)अनकुटे येथील पुर्व भागातील शेतकऱ्यांना दिवसा विज द्या २)तात्काळ विजेची दुरुस्ती करून देण्यात यावी ३)नगरसुल ऐवजी तांदुळवाडी किंवा सावरगाव सबस्टेशनला अनकुटे येथील पुर्व भाग जोडण्यात यावा.अशा मागण्यांचे निवेदन उप कार्यकारी अभियंता यांना नुकतेच सादर करण्यात आले.
प्राप्त निवेदनाची त्वरित दखल घ्यावी अन्यथा तर तिव्र स्वरुपाचे आंदोलन करु असा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे व प्रहार संघटनेचे अनकुटे शाखा अध्यक्ष बालाजी गायकवाड यांनी दिला आहे.
निवेदनावर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे प्रहार शाखाध्यक्ष बालाजी गायकवाड विनायक गायकवाड शिवाजी गायकवाड रावसाहेब सोनवणे मा.सरपंच बाबासाहेब गायकवाड रवी सोनवणे भिमाजी शेलार कल्पेश (भैय्या)गायकवाड सागर गायकवाड बाबासाहेब गायकवाड भागचद गायकवाड योगेश सोनवणे राजेंद्र पगारे प्रकाश गायकवाड दिपक गायकवाड प्रसाद गायकवाड सुजित गायकवाड भाऊसाहेब सोनवणे बाळु गायकवाड शिवाजी सोनवणे साहेबराव सोनवणे सुनील गायकवाड रामु गायकवाड यांच्या सह अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
