नाशिक महानगरपालिकेने नवीन ९५ अधिकृत हॉकर्स झोन वाढविण्याचा घेतला निर्णय

Cityline Media
0
फेरीवाल्यांना मिळणार हक्काची जागा

नाशिक दिनकर गायकवाड शहर परिसरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यासाठी विविध उपाययोजना करत असताना आता नाशिक महापालिकेने नवीन ९५ अधिकृत हॉकर्स झोन वाढविण्याचा निर्णय घेतला असून,त्यामुळे तब्बल १५०० फेरीवाल्यांना आपले व्यवसाय करण्यासाठी हक्काची जागा मिळणार आहे.                  रेखाकंन-मयुरी भागवत 
शहरात अनेक प्रमुख रस्त्यांवर फेरीवाल्यांचे अनधिकृत अतिक्रमण असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.विशेषतः कॉलेज रोड, सीबीएस, पंचवटी,मालेगाव स्टॅण्ड,भद्रकाली, रविवार कारंजा या परिसरात फेरीवाल्यांचे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर अतिक्रमण सुरू आहे.त्यावर कारवाईसाठी महापालिकेला वेळोवेळी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नवीन झोन मंजूर झाल्यास या ठिकाणी नियोजनबद्धपणे फेरीवाल्यांना स्थलांतरित करता येणार आहे.नाशिक महानगरपालिकेने शहरातील वाढत्या बेकायदेशीर फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच रस्त्यांवरील सतत होणारी वाहतूककोंडी कमी करण्यासाठी नवीन ९५ अधिकृत हॉकर्स झोन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे सुमारे दीड हजार फेरीवाल्यांना आपले व्यवसाय करण्यासाठी हक्काची जागा मिळणार आहे. याबाबत मनपाने पोलिसांना पत्र देऊन या जागांसाठी नाहरकत मागवले असून पोलिसांनी एप्रिल महिन्यात पाठवलेल्या पत्राला अद्याप उत्तर दिलेले नाही. शहरात सध्या २२५ अधिकृत हॉकर्स झोन असून त्यात सुमारे १४ हजार फेरीवाले आपले व्यवसाय करीत आहे. त्यात आणखी ९५ नवीन हॉकर्स झोनची वाढ होणार आहे. यामुळे एकूण २३८७ फेरीवाल्यांना जागा मिळणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!