नागरिकांचा तक्रारीचा पाढा वाचताच महानगरपालिकेकडून रस्ता दुरुस्तीला प्रारंभ

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड पावसाच्या विश्रांती नंतर शहराच्या सहाही विभागांतील ३५४४ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. या संधीचा फायदा घेत नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे.
नाशिक महापालिकेच्या विविध विभागांतून प्राप्त झालेल्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करत आतापर्यंत एकूण ३५४४ खड्डे बुजवण्यात आले असल्याची माहिती मनपाचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली. शहरातील सिडको, सातपूर, नाशिकरोड, पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम या भागातील प्रमुख ररस्ते, दैनंदिन वाहतूक असलेले मार्ग, तसेच शाळा व रुग्णालय परिसरातील खड्ड्यांना प्राधान्य देऊन खड्डे बुजविण्यात येत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. शहरात गॅस कंपनी, स्मार्ट सिटी यांनी खोदलेले रस्ते व खड्डे बुजविण्यात पावसाची

प्रत्येक विभागात स्वतंत्र मजूरांकडून काम सुरू
-पावसाच्या विश्रांती मुळे शहराच्या विविध भागांतील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने सुरू आहे. ब्लॉकद्वारे खड्डे बुजविण्यात येत आहे. सहाही नवीन एमपीएम, जीएसबी, तसेच पेव्हर विभागांत अभियंत्यामार्फत प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन कामे सुरू आहेत. प्रभागांमध्ये स्वतंत्र टीममार्फत ही कामे केली जात आहेत.
- संजय अग्रवाल,शहर अभियंता,मनपा,नाशिक.

आडकाठी येत होती. महापालिका बांधकाम विभागाकडून सद्यः स्थितीत एमपीएम, जीएसबी व पेवर ब्लॉकद्वारे खड्डे भरले जात आहेत.

दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या सहाही विभागामध्ये नाशिक पूर्व २२६, नाशिक पश्चिम १२५, पंचवटी २७४, सातपूर - ४००, नाशिकरोड ११९१ आणि सिडको १३२८ असे एकूण - ३५४४ खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे. मात्र महानगरात अद्याप बऱ्याच मोठ्या संख्येने खड्डे तसेच असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!