त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात बनावट दर्शन पासेसचा काळाबाजार करणाऱ्या दलालांची टोळी जेरबंद

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड त्रंबकेश्वर येथील मंदिर परिसरात बनावट ऑनलाईन दर्शन पास मिळवुन त्याचा काळाबाजार करणाऱ्या दलालांची टोळी त्रंबकेश्वर
पोलिसांकडुन नुकतीच जेरबंद झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले पण अशा जास्तीचे पैसे मिळवणाऱ्या टोळ्यांची कसुन चौकशी केली तर त्यातील हप्ते वर पर्यत पोहचत अशी शंका सुज्ञ भाविकांची व्यक्त केली.
अंबकेश्वर जोर्तिलीग येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होत असते. त्यासाठी मंदिर प्रशासनातर्फे एक मोफत दर्शन रांग व एक देणगी दर्शन रांग असे दोन पर्याय निर्माण केले आहेत.देणगी दर्शन रांगेसाठी प्रति व्यक्ती २०० रुपये घेतले जातात त्यासाठी मंदिर परीसरात दर्शन पास काउंटर तसेच ऑनलाईन दर्शन पास काढण्याची व्यवस्था आहे.

मागील काही दिवसात माध्यमांमध्ये त्रंबकेश्वर मंदिर परीसरात ऑनलाईन दर्शन पास मध्ये काळाबाजार होत असले बाबत वृत्त प्रसिध्द झाले होते. त्याबाबत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच मंदिराचे पदसिध्द अध्यक्ष अतिरीक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साळी यांनी त्याची गंभीर दखल घेउन असे गैरप्रकार उघडकीस आणुन त्याबाबत कडक कारवाई करण्याचे त्रंबकेश्वर पोलीस ठाण्यास सुचना दिल्या होत्या.

या प्रकाराबाबत खातरजमा करून गुप्त माहितीच्या आधारे त्रंबकेश्वर परिसरातुन एकुण ५ इसमांना ताब्यात घेवुन ते बनावट नाव पत्ता व बनावट ओळखपत्र कमांक वापरुन मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पास मिळवुन ते गरजवंत भाविकांना प्रति व्यक्ती २०० रुपये दराचा 

देणगी पास प्रति व्यक्ती ७०० रुपये ते १,००० रुपये या दराने विकुन बनावट पासचा काळाबाजार करत असल्याचे त्यांचे झडतीतुन मिळालेल्या मोबाईल मधुन व मेल आयडीचे हिस्ट्रीवरुन दिसुन आल्याने त्यांचे विरुध्द पोलीस प्रशासना तर्फे तकार देवुन संघटीतपणे गुन्हा रजिस्टर कमांक १०२/२०२५ दाखल करण्यात आला असुन त्यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
त्यांचे अत्तापर्यंत झालेल्या तपासात त्यांनी एकुण १६४८ बनावट देणगी पास काढल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये एकुण अंदाजे ५,००० भाविकांना बनावट पास चढया भावाने विकल्याचे दिसुन येत आहे.

अटक केलेल्या आरोपींचे नावे दिलीप नाना झोले, रा. पेगलवाडी त्रंबक ता. त्रंबकेश्वर जि. नाशिक,
सुदाम राजु बदादे रा. पेगलवाडी नाशिक, ता. त्रंबकेश्वर जि. नाशिक समाधान झुंबर चोथे, रा. रोकडवाडी, ता. त्रंबकेश्वर जि. नाशिक शिवराज दिनकर आहेर, रा. निरंजनी आखाडया जवळ, ता. त्रंबकेश्वर जि. नाशिक मनोहर मोहन शेवरे, रा. रोकडवाडी, ता.त्रंबकेश्वर, जि. नाशिक अशी आहेत कारवाई मध्ये ऑनलाईन पास काढण्याची यंत्रणा ही सदोष असल्याचे दिसुन येत असुन त्यामध्ये अनेक सुधारणा करण्याची अवश्यकता असल्याचे मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष यांचेशी चर्चा झाली असुन त्यामध्ये कडक योग्य त्या सुधारणा तातडीने करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

कार्यवाहीसाठीपोलीस अधीक्षक. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक. आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ,.वासुदेव देसले, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक,. रवी मगर, त्रंबकेश्वर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी. महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गावित, यांचेसमवेत पोहवा जाधव, पोहवा मुळाणे, पोशि बोराडे, पोशि राठोड, पोशि ठाकरे हे पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!